वालसावंगी : शेतात भिजत असलेली मिरची. 
 वालसावंगी : शेतात भिजत असलेली मिरची.  
मराठवाडा

मिरची तोडणीला पावसामुळे खोळंबा

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) -  यंदा ऐन बहरात असलेल्या, मोठ्या प्रमाणावर हिरवी मिरची लगडलेल्या मिरचीला तोडणीच्या वेळी सातत्याने आलेल्या पावसामुळे मोठा फटका बसला. यामुळे मिरचीचा दर्जा खालावला. परिणामी भावही कमी मिळाला. आता लाल मिरचीवर उत्पादक शेतकऱ्यांची मदार आहे; मात्र लाल मिरचीच्या वेळी पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे उन्हात वाळवत असलेल्या मिरचीवर आच्छादन टाकावे लागत आहे. शिवाय झाडावरची तोडणीदेखील थांबली आहे. झाडावरची लाल मिरची पावसात भिजत असल्याने लाल मिरचीचा दर्जा खराब होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

यंदा सुरवातीला पाऊस बरसत असल्याने मिरची पीक बहरात होते. शिवाय रोगराईसुद्धा यंदा चार हात दूर राहिली. परिणामी मोठ्या प्रमाणावर मिरच्या लागडल्या. चांगले उत्पादन निघण्याची आशा उत्पादक शेतकऱ्यांना होती. सुरवातीला पहिल्या तोड्याला भावदेखील चांगला मिळाला; मात्र नंतर परिसरात दररोज पाऊस बरसत राहिला. यामुळे मिरचीचा दर्जा खालावत गेला. शिवाय बाजारात भावदेखील कवडीमोल मिळाला. यामुळे कंटाळून उत्पादक शेतकऱ्यांनी मिरची तोडणी पूर्णतः थांबविली होती. 

लाल मिरचीवर मदार 
सध्या अनेक शेतांत हिरव्या मिरच्या लाल झाल्या असून, काही शेतांत लाल मिरचीचे खळे रंगण्यास सुरवात झाली आहे. सध्या नागपूर, सोलापूरसह विविध बाजारपेठांत मिरचीला 100 ते 140 रुपये किलोपर्यंत लाल मिरचीला भाव मिळत आहे. पुढे अजून भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची संपूर्ण मदार लाल मिरचीवर अवलंबून आहे. काही दिवसांत गावातदेखील मोठ्या प्रमाणावर लाल मिरची खरेदी होणार आहे. 

यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती; मात्र पावसामुळे मिरचीला चांगला भाव मिळू शकला नाही. त्यामुळे आता लाल मिरची करणे सुरू आहे. आता परत पाऊस सुरू झाल्याने मनात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. 
- रुखमाजी बोडखे, उत्पादक शेतकरी 
------- 
यंदा हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळाला असता; मात्र पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. आता सुरवातीलाच लाल मिरचीला अपेक्षित भाव मिळतो आहे. चांगल्या दर्जाच्या लाल मिरचीला पुढे अजून चांगला भाव मिळू शकतो. पावसाने उघडीप देणे मात्र गरजेचे आहे. 
- किरण फुसे, व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT