rain update
rain update sakal
मराठवाडा

हिंगोलीत सलग पाचव्या दिवशीही पाऊस

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात शुक्रवारी ता. २४ सलग पाचव्या दिवशीही सकाळी सहा ते आठ यावेळी रिमझिम पाऊस झाला असुन आज सकाळी आठ वाजेपर्यंत ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११७. १३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ११ मिलिमीटर पाऊस झाला. तालुका निहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे हिंगोली तालुका ३.७० मिलिमीटर, कळमनुरी ५.४० वसमत १४.९० औंढा नागनाथ ३१.७० सेनगाव ३.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात ११७.१३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असा सलग पाच दिवस पाऊस झाला. आज सकाळी सहा ते आठ या वेळी रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. मात्र ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

या पावसाने सोयाबीन काढणीस व्यत्यय आला असुन अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापणी केलेले सोयाबीन पावसाने भिजले आहे. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव तालुक्यात सर्वदुर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT