प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र 
मराठवाडा

पंधरा महसूल मंडळांत 25 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः  जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावत आहे. यात बुधवारी (ता. 25) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील 15 महसूल मंडळांत 25 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. इतर महसूल मंडळांतही पाऊस झाला आहे. हा पाऊस वाळत चाललेल्या खरीप पिकांसाठी चांगला असून पिकांना जीवदान मिळाले आहे; पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज आहे. 


यावर्षी जिल्ह्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे लातूरकरांच्या आशा परतीच्या पावसावर होत्या. पावसाळ्याचा चौथा महिनाही संपत आला तरी मोठा पाऊस झालेला नाही. यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील पंधरा महसूल मंडळांत 25 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यात शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. 


बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत लातूर महसूल मंडळात 25, कासारखेडा 22, गातेगाव 15, तांदुळजा 15, मुरूड तीन, बाभळगाव पाच, हरंगूळ 34, चिंचोली 22, औसा 39, लामजना 32, किल्लारी 19, मातोळा 57, भादा 22, किनीथोट 11, बेलकुंड 24, रेणापूर 17, पोहरेगाव दहा, कारेपूर 17, पानगाव 20, उदगीर पाच, हेर चार, देवर्जन 27, वाढवणा 21, अहदमपूर 17, किनगाव 14, खंडाळी दहा, शिरूर ताजबंद 19, हाडोळती तीन, अंधोरी चार, चाकूर 22, वडवळ 30, नळेगाव आठ, झरी दहा, शेळगाव 36, जळकोट तीन, घोणसी दहा, निलंगा चार, अंबुलगा एक, कासारशिरसी पाच, मदनसुरी चार, औराद दोन, कासारबालकुंदा दोन, निटूर 52, पानचिंचोली 41, देवणी एक, शिरूर अनंतपाळ 38, हिसामाबाद 46, साकोळ महसूल मंडळात 60 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 


यात लातूर तालुक्‍यात सरासरी 17.63, औसा 29.14, रेणापूर 16, उदगीर 8.14, अहमदपूर 11.17, चाकूर 21.20, जळकोट 6.50, निलंगा 13.88, देवणी 0.33, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात 48 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पडत असलेला पाऊस खरीप पिकांसाठी चांगला आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT