Ramdas Athavale statement Modi government in 2024 Mamata Banerjee politics beed
Ramdas Athavale statement Modi government in 2024 Mamata Banerjee politics beed sakal
मराठवाडा

२०२४ मध्येही मोदी सरकारच : रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई, (जि.बीड) : विविध विकास कामांच्या पाठबळावर देशात आगामी लोकसभा निवडणुकीत २०२४ मध्येही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असेल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, की मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गत आठ वर्षांत महामार्गांसह वेगवेगळ्या क्षेत्रांत विकास घडवून आणला. विविध योजना आखल्या व त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. देशात प्रगती घडवून आणली. कित्येक वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला असा विकास घडवता आला नाही. विकास, प्रगतीच्या बळावर २०२४ च्या पंचवार्षिक निवडणुकीतही मोदींचेच नेतृत्व असेल.

रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह देशात सर्व विरोधक एकत्र आले तरी त्यांना मोदींशी सामना करणे अशक्य आहे.

महाडीक विजयी होतील

‘आरपीआय’ला राज्यसभेची एखादी जागा मिळायला पाहिजे होती, अशी खंत व्यक्त करीत आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीकच निवडून येतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : इशान किशन अन् नेहलनं डाव सावरला

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT