Rameshwar Sabbanwad
Rameshwar Sabbanwad Sakal
मराठवाडा

किराणा दुकानदाराचा मुलगा झाला आयएएस

युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर) - हंडरगुळी (ता. उदगीर) येथील किराणा दुकानदार सुधाकर सब्बनवाड यांचा मुलगा रामेश्वर सब्बनवाड यांनी यूपीएससी परीक्षेत २०२ रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश मिळू शकते हे सिद्ध होत असल्याची भावना त्यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

श्री सब्बनवाड यांचे प्राथमिक शिक्षण हंडरगुळीच्या रामराव पाटील प्राथमिक विद्यालयात झाले. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी मिळवली. पुणे येथे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुठलेही क्लासेस न लावता यूपीएससीचा अभ्यास केला व दुसऱ्या वेळेस त्यांना उज्वल यश मिळाले आहे. हळी हंडरगुळी हे बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे.

या गावचे पहिले आयएएस अधिकारी होण्याचा मान श्री सब्बनवाड यांना मिळाला आहे. ही बाब समजताच हाळी हंडरगुळी येथे जल्लोष करण्यात आला व रामेश्वर यांच्या वडिलांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. एक सामान्य किराणा दुकानदार आपल्या आयएएस करू शकले. यासाठी त्यांचे तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे. याबाबत आयएएस श्री सब्बनवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मी पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नाही.त्या वेळी थोडासा नाराज झालो मात्र जिद्द कायम ठेवली, सातत्याने अभ्यास केला, निश्चितपणे यशस्वी व्हायचे हा उद्देश ठेवून प्रयत्न केला दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाल्याचा मनस्वी आनंद आहे. मला आयएएस म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. माझ्या यशाचे श्रेय पुणे येथे राहत असत असलेल्या ठिकाणचे पाटील सर आई-वडील व माझा भाऊ यांचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT