raniuchegaon shivajinagr robbery case stolen worth rs 6 lakh jalna marathi crime news
raniuchegaon shivajinagr robbery case stolen worth rs 6 lakh jalna marathi crime news esakal
मराठवाडा

Jalna Crime : राणीउंचेगाव येथील शिवाजीनगरमध्ये घरफोडी; सोन्या,चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम 6 लाख 87 हजार लंपास

बाबासाहेब गोंटे

अंबड,जि.जालना : राणीउंचेगाव(ता.घनसावंगी) येथील शिवाजीनगर येथील शेतकरी गोरखनाथ रामधन राठोड यांची कोणीतरी अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून सोन्या,चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून एकूण 6 लाख 87 हजार रुपयांवर डल्ला मारला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,राणीउंचेगाव येथील शिवाजीनगरमधील गोरखनाथ राठोड हे आपल्या पत्नी सोबत शेतीच्या कामासाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने सोमवारी (ता.18) दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान घराचे कडी, कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरामधील रोख रक्कम 1 लाख 19 हजार,पंधरा ग्राम वजनाचे 45 हजार रुपये किंमतीचे नेकलेस,14 ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील झुंबर ज्याची किंमत 48 हजार रुपये,सोन्याचे दोन गंठण प्रत्येकी 28 ग्राम वजनी जुने वापरते ज्यांची किंमत 1 लाख 62 हजार रुपये,

15 हजार रुपये किंमतीची 5 ग्राम वजनाची सोन्याची अंगठी,सोन्याचे नेकलेस 12 ग्राम चे जुने वापरते ज्यांची किंमत 36 हजार रुपये,सोन्याची 5 ग्रामची नथ 15 हजार रुपये,सोन्याचे वेल,झुंबर 12 ग्राम 36 हजार रुपये किंमतीचे,

सोन्याचे मिनी गंठण 15 ग्रामचे 45 हजार रुपये किंमतीचे याचबरोबर गोवर्धन राठोड यांचा मित्र प्रल्हाद गोपीनाथ माने यांनी राठोड यांच्या घरात ठेवलेल्या दागिन्यांवर सुध्दा चोरट्याने डल्ला मारला आहे.

यामध्ये सोन्याचे गंठण 11 ग्राम वजनी जुने वापरते 33 हजार रुपयांचे,साडे सात हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या,12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गळ्यातील ओम(पत्ता), कानातील सोन्याची एक ग्राम ची 3 हजार रुपयांची बाळी मिळून अज्ञात चोरट्याने 6 लाख 87 हजार रुपयावर डल्ला मारला आहे.

घटनेच्या ठिकाणी अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे,पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन,पोलीस उपनिरीक्षक स्कॉट यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्कॉट हे करत आहे.अशी माहिती ठाणे अंमलदार स्कॉट हे करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT