Aurangabad news  
मराठवाडा

चक्क पोलिसावरच बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मुंबई मुख्यालयात पोलीस शिपाई असलेल्या कर्मचाऱ्यांने शहरात पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असलेल्या 22 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शाररिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाला नकार दिल्याने फसवणुक झालेल्या मुलीच्या तक्रारीवरुन त्या पोलीसावर बलात्काराचा गुन्हा हर्सुल पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला.

मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार, वर्षभरापूर्वी विशाल उर्फ भय्यासाहेब हरी औटे (रा. वडगाव जि. हिंगोली) या मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याशी शहरातील एका पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग घेत असलेल्या 22 वर्षीय मुलीची ओळख व्हाट्‌सऍपच्या माध्यमातून झाली. त्यावेळी तो दौंड येथे पोलीस ट्रेनिंगमध्ये होता. व्हाट्‌सऍपवरील मैत्रीतून एकटी किरायाच्या रुममध्ये राहणाऱ्या मैत्रीणीला भेटण्यासाठी 23 एप्रिल 2011 ला शहरात आला.

रुमवर भेटल्यावर त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याने मैत्रीचे रुपांतर शारीरिक संबंधात झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल अंघोळ करुन निघून गेला. त्यानंतर जुनमध्ये मुलगी त्याला दौंडला भेटायला गेली त्यावेळी त्याने तिथे लॉज करुन शाररीक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान तो ऑक्‍टोबर व नोव्हेंबर मध्ये दोन वेळा शहरात आला. त्यावेळी लॉजमध्ये भेटून शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी मुलीने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरल्यावर त्याने टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर वाद झाल्यावर त्याने त्याचे लग्न झाल्याचे सांगितले, असे मुलीच्या तक्रारीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर मुलीने प्रकार आई-वडीलांना सांगितल्यावर हर्सुल पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरुन विशाल औटे याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीआधी इंधनाचे नवे दर जाहीर! मुंबई-पुणे आणि राज्यभरात आता पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

KKR Brand Value: बाबो! KKR ची ब्रँड व्हॅल्यू मुंबई-चेन्नईपेक्षा जास्त; तर सर्वात कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोण अव्वल?

India Pakistan UN : आपल्याच नागरिकांवर बॉम्ब हल्ले करणाऱ्या देशाने आम्हाला शिकवू नये, दहशतवादावरुन भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

‘लाल लाल कलरची बांगडी…’ तन्वी कोलतेचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Pune Crime: बंडू आंदेकरने जेलच्या भिंतीआडून रचला रक्तरंजित कट? वनराजच्या हत्येचा बदला की गँगवॉरचा नवा अध्याय? टोळीच्या ६ जणांना अटक!

SCROLL FOR NEXT