file photo
file photo 
मराठवाडा

सेनगावात मतिमंद महिलेवर अत्याचार 

राजेश दारव्हेकर

सेनगाव  (जिल्हा हिंगोली) : सेनगाव येथे एका मतिमंद महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी गुरूवारी (ता. २८) एकाविरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पीडीत महिला गर्भवती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या धक्कादायक प्रकारमुळे सेनमगावमध्ये खळबळ उडाली आहे. अत्याचार करणाऱ्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव येथील एका ३५ वर्षीय मतीमंद महिला आखाड्यावर राहत होती. ती एकटी असताना रमेश लांडे राहणार सेनगाव याने चार ते पाच महिण्यापुर्वी तिच्यावर सतत अत्याचार केला. याबाबत वाचत्या केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पीडीत महिला गर्भवती राहीली आहे. अत्याचार केल्याप्रकरणी रमेश लांडे विरुध्द गुन्हा दाखल झाला असून आरोपीला ताब्यात घेवून त्‍याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  

धमकी देऊन करीत होता अत्याचार

सेनगाव येथील शेतातील आखाड्यावर एक ३५ वर्षीय मतिमंद महिला एकटी पाहून तिच्या इच्‍छेविरुध्द सतत तीन दिवस रमेश लांडे (वय ३०) यांने त्या संधीचा फायदा घेत तिच्या शेतातील आखाड्यावर येऊन महिलेचे जबरदस्‍ती तोंड रुमालाने बांधून अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगू नका नसता तुला मारून टाकतो अशी धमकी दिली. भयभीत झालेल्या महिलेने भीतीपोटी ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र या प्रकाराने ती महिला गर्भवती राहील्याची बाब उघडकीस आली सदर घटने बाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रमेश लांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
या बाबत पोलिस उपनिरिक्षक सरदासिंग ठाकूर पोलीस उपनिरिक्षक बी. आर. जाधव यांनी या प्रकरणी भेट दिली आहे. व आरोपीला अटक करून शुक्रवारी (ता.29) न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

बोल्‍डाफाटा येथे अवैध देशीदारूचे सात बॉक्‍स जप्त

आखाडा बाळापुर : बोल्डाफाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवार (ता. २९) टाकलेल्या छाप्यात अवैध देशी दारूचे सात बॉक्स जप्त केले आहेत. या दारुची किंमत २७ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बोल्डा फाटा येथे विनापरवाना देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शानाखाली उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार विलास सोनवणे, शंकर जाधव, विशाल घोळवे, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे, महिला पोलीस कर्मचारी पारू कुडमेथे यांच्या पथकाने शुक्रवारी बोल्डा फाटा येथे छापा टाकला. 

तुकाराम ढोकणेविरुद्ध गुन्हा दाखल  


यामध्ये तुकाराम सटवाजी ढोकणे हा बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत असताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून २७ हजाराची देशी दारू जप्त केली. पोलिसांनी तुकाराम ढोकणेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याने वसमत तालुक्यातील चोंडी आंबा येथील गोविंद भोसले यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT