Rapecase registered in Udgir
Rapecase registered in Udgir 
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात नगरसेविका पतीचा विवाहितेवर बलात्कार

युवराज धोतरे
उदगीर (जि. लातूर) : देशभरात सध्या बलात्कार घटनांच्या चर्चा सुरू असतानाच उदगीरात  नगरसेवक पतीने एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली असून शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उदगीर नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा जुबेर मिर्झा याचे पती अक्रम मिर्झा यांनी शहरातील गांधिनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर सन 2014 पासून ते 2019 पर्यंत अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने पाच वर्षे बलात्कार केला.
शिवाय याबाबतीत कुणाला जर माहिती सांगितली तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देत वारंवार बलात्कार करत असल्याची फिर्याद पीडित विवाहितेने शहर पोलिसात दिली. फिर्यादीवरुन शुक्रवारी (ता.6) रात्री अकरा वाजता आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अक्रम मिर्झा यास रात्रीच अटक करण्यात आलेली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची पोलीस उपनिरीक्षक व्हि. आय. एडके अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT