संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

मैत्रिणीवर अत्याचार करणारा अटकेत

सुषेन जाधव

औरंगाबाद : मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्या संशयित मित्रास गुरुवारी (ता. 22) पहाटे पोलिसांनी अटक केली. केतन पवार (29, रा. प्रतापगडनगर, एन-9, सिडको) असे त्याचे नाव आहे. 19 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता ही शहरातील एका महाविद्यालयात बीसीएस या पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेते. वर्षभरापूर्वी मित्रामार्फत तिची केतनशी ओळख झाली. ओळखीनंतर पीडिता व केतनची गाठ-भेट व फोनवर बोलणे होत होते. 26 नोव्हेंबर 2018 ला पीडिता संशयिताच्या कारमधून (क्रं. एमएच-20, ईई-4419) पैठणला फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी कारचा अपघात झाला. त्यात पीडिता जखमी झाली. घटनेनंतर केतन पीडितेच्या गल्लीत वारंवार चकरा मारायचा व फोन करून बोलण्याचा प्रयत्न करायचा. या कारणामुळे पीडितेच्या घरी सतत वाद होत होते. वादाला कंटाळून पीडिता रागाच्या भरात 17 ऑगस्टला मध्यरात्री नंतर घरा बाहेर निघून गेली. तिने संशयित केतनला फोन करुन बोलावून घेतले. त्यानुसार तो कारने तेथे आला व त्याने पीडितेला सेव्हन हिल परिसरातील एका गॅरेज समोर नेले. तेथे कारमध्येच अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडिता घरी आली व तीने सर्व घटना वडीलांना सांगितली. 

रविवारपर्यंत पोलिस कोठडी 

प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता, रविवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहरकर यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी युक्तीवाद केला.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT