Recommendation to the government for Jalyukt Shivar work says Divakar Raote
Recommendation to the government for Jalyukt Shivar work says Divakar Raote 
मराठवाडा

'जलयुक्त'च्या कामांसाठी शासनाकडे करणार शिफारस : रावते

शेख मुनाफ

आडुळ : दुष्काळी भागात जास्तीत-जास्त रोजगार हमी योजनेंतर्गत जलयुक्त शिवाराची कामे हातात घेण्यात यावी, अशी शिफारस शासन दरबारी करणार असल्याचे  परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. शनिवारी (ता.१३) आडुळसह (ता. पैठण, जि.औरंगाबाद) परिसरातील अब्दुल्लापुर तांडा, 
पारुंडी तांडा, पारुंडी येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत  होते. 

रावते यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी करुन पिकांचे किती नुकसान झाले. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची व ग्रामीण भागात कोणते रोजगार उपलब्ध आहेत. याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार संदिपान भुमरे,  जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, विलास भुमरे (सभापती जिल्हा परिषद), उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव , तहसीलदार महेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी जिल्हा, पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ, कृष्णा चव्हाण, गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी,  तालुका कृषी अधिकारी रामदास कारले, मंडळ अधिकारी भारती मादनकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन रावते यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT