file photo
file photo 
मराठवाडा

चाकु दाखवून विद्यार्थ्यांना लुटले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील दोन विद्यार्थ्यांना चाकुचा धाक दाकवून त्यांच्या जवळची सात हजार २०० रुपये जबरीने चोरुन घेतले. ही घटना सोमवारी (ता. १८) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. मात्र या प्रकरणी बुधवारी (ता. १९) गुन्हा दाखल झाला. अशा वाढत्या घटनांमुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी व पालकवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. 

शहराच्या यशवंत कॉलेज ते शंकरराव चव्हाण पुतळा रस्त्यावर श्रीनिवास रंविंद्र पांडे, रा. फुलसांगवी, ता. महागाव, जिल्हा यवतमाळ हा आणि त्याचा मित्र मुसेब कयामोद्दीन नवाब हे दोघेजण श्रीनगरकडे पायी जात होते. यावेळी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांना काळ्या रंगाच्या विनानंबरच्या शाईन दुचाकीवरून आलेल्या अनोळखी तिन चोरट्यांनी थांबविले. त्यातील एकाने खाली उतरून या दोघांना चाकुचा धाक दाखविला. तुमच्याजवळ जे काही आहे ते काढून द्या असे म्हंटल्यावर आम्ही विद्यार्थी आहोत, आमच्याकडे पैसे नाहीत असे म्हणताच एकाला मारहाण केली. जबरीने त्यांच्या खिशात हात टाकून मुसेब याच्याकडून तीन हजार ४०० व  निवासकडून तीन हजार ८०० असा सात हजार २०० रुपयाचा एेवज काढून घेतला.

एवढेच नाही तर हा प्रकार पोलिसांना सांगितला तर ठार मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेल्या या एकाच गावच्या विद्यार्थ्यानी आपली रुम गाठली. घडलेला प्रकार त्यांनी पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी नांदेड गाठून त्यांना धिर दिला. बुधवारी (ता. १९) सायंकाळी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. मुसेब नवाब याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अनोळखी तिन चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. वाहूळे करित आहेत.
 
शहरात विद्यार्थ्यांना रस्त्यात गाठून चाकुचा धाक दाखवून त्यांच्याजवळचा मोबाईल, रोख रक्कम पळविणारी टोळी सक्रीय झाली आहे. मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्ग चिंतातूर झाला आहे. नांदेड शहरात वैद्यकिय व इंजिनिरींगसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात. परंतु त्या विद्यार्थ्यांना रस्त्यात गाठून धमकी देऊन त्यांना चाकु, खंजरचा धाक दाखवून जबरीने वाटमारी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येते. 

शहराच्या बाबानगर, श्रीनगर, श्यामनगर, पाटनुरकरनगर, भाग्यनगर आनंदनगर परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी शिकवणी वर्ग चालतात. मात्र लुटमारीच्या घटनामुळे शहरात राहणारा विद्यार्थी चांगलाच भयभीत झाला आहे. तर दुसरीकडे बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थीनीच्या छेडछाडीच्या घटना घडत असल्याने विद्यार्थीनीही भितीच्या सावटात शिक्षण घेत आहेत. या बाबीकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी पालक वर्गातून मागणी होत आहे. 


दामिनी पथक कुठे आहे ? 

शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थीनीसह महिलांच्या छेडछाडीच्या विरोधात पोलिसांचे दामिनी पथक कार्यरत आहे. परंतु एेनवेळी हे पथक नेमके कुे असते की समजायला तयार नाही. खासगी शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना नाहक त्रास देणारी मंडळी राजरोसपणे फिरत असते. या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अशा रोडरोमीयोवर कडक कारवाई करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT