Traffic-Police
Traffic-Police 
मराठवाडा

चक्क पोलिसच म्हणतात, ऑनलाइन पावत्या बंद!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - वाहतूक पोलिस व वाहनधारक यांच्यात भांडण-तंटा उद्‌भवू नये म्हणून पोलिसांना कारवाईसाठी कॅमेरे दिले गेले. मोबाईलमध्ये वाहनाचा फोटो काढून, सेफ सिटीच्या कॅमेऱ्याद्वारे ऑनलाइन चालानद्वारे कारवाईसाठी चालना दिली जात असताना याला फाटा देत रस्त्यावर वाहतूक पोलिस ऑफलाइन कारवाईसाठी आग्रही असल्याचे एका तरुणासोबत घडलेल्या प्रकारावरून दिसून आले. त्याने आपल्यावरील अन्यायाबाबत रविवारी (ता. पाच) सिडको पोलिसांत तक्रार दिली आहे.   

प्रेमदास रोहिदास घोडके हा तरुण ब्रिजवाडीत राहतो. त्याने याबाबत सिडको ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, तो रविवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास दुचाकीने जॉबसाठी कॅनॉटकडून प्रोझोन मॉलकडे जात होता. भारतीय स्टेट बॅंकेजवळ वाहतूक पोलिसाने हेल्मेट नसल्याने घोडकेला अडविले. त्यानंतर दंडपावती भरण्यासाठी आग्रह केला. तरुणाने ‘‘आपल्याकडे पैसे नाहीत; दुचाकीसह फोटो काढून घरपोच पावती द्यावी,’’ अशी त्याने मागणी केली. यावर पोलिस आक्रमक झाले व त्यांनी दुचाकीच ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे तरुणाकरवी पोलिसाच्या जबरदस्तीचे छायाचित्रण सुरू केले गेले. या प्रकारानंतर आणखी दोन वाहतूक पोलिस तेथे पोचले. ‘‘चावी काढू नका, गाडी ताब्यात घेऊ नका. लर्निंग लायसन्स आहे, ऑनलाइन पावती द्यावी,’’ असे त्याने सांगताच वाहतूक पोलिसाने चक्क ऑनलाइन पावत्याच बंद केल्या. आता दंडपावती भरण्याचे दरडावून सांगितले. विनाहेल्मेट होतो हा गुन्हा मान्य पण वाहतूक पोलिसांवर कारवाई करावी, अशी त्याने तक्रारीत मागणी केली.

दुचाकीस्वाराला बाजूला घेऊन विचारपूस करताना त्यांनी व्हिडिओ शुटिंग केले. विनाहेल्मेट असल्याने व कागदपत्रे, लायसन्स विचारल्यानंतर त्यांच्याजवळ लर्निंग लायसन्स असल्याचे सांगितले. त्यांनी पावती घेतली नाही म्हणून गाडी लावली, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत वाहतूक पोलिस व तरुणाला समोरासमोर बोलावून खात्री करणार आहे.
- निर्मला परदेशी, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, सिडको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT