नांदेड : ‘कोरोना’चे नाव जरी ऐकले तरी अनेकांना धडकी भरत आहे. यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘कोरोना’बद्दल अनेक माहिती येत असल्याने जनतेमध्ये विनाकारण धडकी भरविण्याचे काम सुरु आहे. या अफवांमुळे शासकीय यंत्रणेला वस्तुस्थिती तपासण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सध्या अफवा पसरवणाऱ्या रिकामटेकड्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, बुधवारी (ता. १८) नांदेड शहर आणि जिल्ह्यात दिवसभरात कुणीही अफवा पसरवल्याची हिंमत केली नाही.
विशेष म्हणजे एकीकडे ‘कोरोना’बद्दल सरकार सर्व ती खबरदारी घेत आहे. शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार, मोठी हॉटेल, चित्रपटगृह, मॉल्स, रेल्वे, विमान, एसटी बस रद्द करुन कोरोना पसरवू नये, या साठी खबरदारी घेतली जात आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडुनका, नको त्या ठिकाणी गर्दी करु नका, असे आवाहन शासनाकडून केले जात आहे. राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा डोळ्यात तेल घालून कोरोना रोखण्यासाठी दिवसभर कार्यरत आहे. नागरिक देखील आरोग्य यंत्रणेचा तसेच मेडीकल कंपन्यांचा सल्ला घेत आहेत.
हेही वाचा- नांदेडला अवेळी पावसासह गारपीट
इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या नावाचा वापर
कोरोना रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असताना आणि धडकी भरवणाऱ्या या रोगाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मात्र रिकामटेकडे सोशल मीडियातून ‘कोरोना’बद्दल भीती पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. मोबाईल वेडे हातात मोबाईल आला की, बिनबुडांच्या अफवा पसरत असल्याने जनतेमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. बीडनंतर आता नांदेड जिल्ह्यात मंगळवारी अनेकजण सिडकोत कोरोना रुग्ण आढळा, तर कुणी कंधारला कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याचे दिवसभर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सांगत होते. यासाठी या रिकामटेकड्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या नावाचा वापर करुन त्यांच्या आकडेवारीला छेडछाड करत हे कारनामे सुरु केले होते. त्यामुळे जिल्ह्याधिकारी यांच्यासह संबंध आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची धावधाव होत आहे.
हेही वाचलेच पाहिजे- ‘एलआयसी’च्या या विभागाला कोरोनाचा फटका; उत्पन्न झाली पन्नास टक्क्यांने घट
कोरोनाच्या नावाची धसकी
मात्र, प्रत्यक्षात खातरजमा केली असता जिल्ह्यात एकही कोरोना संबंधीत आजारी व्यक्ती नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जनतेला घाबरवणारी एकही पोस्ट किंवा अफवा पसरवू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. मात्र, असे असताना देखील काही रिकामटेकड्यांना मात्र नसते उद्योग केल्याशिवाय राहवत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या या रिकाम्या उद्योगामुळे लहान मुले, सामान्य जनता कोरोनाच्या नावाची धसकी घेत आहेत. त्यामुळे मंगळवारी नांदेड जिल्ह्यात अफवा पसरविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मात्र रिकामटेकड्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नये
नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. अफवा पसरविण्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस ठाणे येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना मास्क आणि हॅण्डग्लोजचे वाटप करुन सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.