मराठवाडा

संविधान बदलासाठी ‘आरएसएस’कडून संभाजी भिडेंचा वापर - प्रकाश आंबेडकर

सकाळवृत्तसेवा

बीड - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा असून, यासाठी संभाजी भीडे यांचा वापर केला जात असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. मराठा समाजाला १६ टक्के जागा देण्याची घोषणा फसवी असून, मराठा समाजा विरोधात ओबीसींना उभे करण्याची खेळी असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पंढरपुर वारीच्या दरम्यान संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे भिडेंचे वक्तव्य जाणिवपूर्वक असल्याचेही श्री. आंबेडकर म्हणाले. 
वंचितांच्या संवाद परिषदेसाठी शुक्रवारी (ता. २०) शहरात आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपराकार लक्ष्मण माने, डॉ. विजय मोरे सोबत होते. 

१५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्यदिन असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काळा दिवस म्हणून साजरा केला होता. तर, १४ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता असा आरोपही त्यांनी केला. भाजप पूर्वीपासून आरक्षण विरोधी असून, मराठा आरक्षणालाही त्यांचा खोडा असल्याचा आरोप त्यांनी केला. मेगा भरतीतील १६ टक्के जागा आरक्षीत ठेवू अशी घोषणा करण्यापेक्षा त्या जागा समाजाला का दिल्या नाही असा सवालही त्यांनी केला.

भिडेंनी मुनचा पुरस्कार केला असला तरी वारकऱ्यांनी त्याचा निषेध केल्याचे आंबेडकर म्हणाले. भाजप हटविण्यासाठी सर्व सेक्युलर पक्षांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सामगितले. धनगर, माळी, मुस्लिम अशा वंचित समाजांना प्रत्येकी दोन अशा १२ जागा काँग्रेसने द्याव्यात असा प्रस्ताव आपण ठेवल्याचे आंबेडकर म्हणाले. आमच्या प्रस्तावावर काँगेस कसा विचार करतो त्यावर पुढील वाटचाल असल्याचे त्यांनी सांगीतले. देशात श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब आहे अधिक गरीब होत असून गरिबांपासून शिक्षण दूर नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मागच्या चार वर्षांत जात व जातींवरुन तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाला १६ टक्के जागा देण्याची घोषणा फसवी असल्याचा आरोप करुन मराठा विरोधात ओबीसींना उभे करण्याची ही खेळी असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक असल्याचा आरोप करुन हा पक्ष सेक्युलर नसल्याचेही आंबेडकर म्हणाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT