drown_5_0.jpg 
मराठवाडा

बीड ब्रेकिंग : चप्पू उलटून माजलगाव धरणात एकाच घरातील तिघे बुडाले, शोधकार्य सुरु

दत्ता देशमुख

बीड : माजलगाव तलावाच्या बॅकवॉटरमध्ये वादळामुळे चप्पू उलटून पाच जण पाण्यात पडले. यातील दोघे पोहत बाहेर आले तर तिघांचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. खळवट लिमगाव (ता. वडवणी) येथे गुरुवारी (ता. २२) सायंकाळी ही घटना घडली. 


खळवट लिमगाव हे गाव माजलगाव धरणाच्या काठावर आहे. धरणाच्या पलीकडे काही शेतकऱ्यांची शेती आहे. माजलगाव धरण सध्या शंभर टक्के भरल्याने या तलावात पाणी ओसंडून वाहत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी दोन्ही टोकांना दोरी बांधून चप्पू तयार केलेले आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शेतातील काम आटोपून भारत फरताडे व त्यांचे कुटुंबीय चप्पूवर बसून घराकडे जात होते. चप्पू तलावाच्या मध्यभागी आल्यानंतर अचानक वादळी वारे आले. 

यात चप्पू हेलकावल्याने भारत फरताडे यांच्यासह त्यांची पत्नी सुश्मा उर्फ सुशीला, मुलगा आर्यन, सासू अनिता नाईकवाडे, भाची पूजा काळे (रा. माली पारगाव ता. माजलगाव) हे पाच जण तलावातील पाण्यात पडले. भारत फरताडे व सासू अनिता नाईकवाडे हे पोहोत पाण्याबाहेर आले. त्यांनी आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. भोई समाजाच्या तरुणांनी पाण्यात उडी घेऊन तिघांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, उशिरापर्यंत तिघांचा शोध लागला नव्हता.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sion Bridge: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार; प्रशासनाकडून तारीख आली समोर

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT