hingoli
hingoli 
मराठवाडा

हुतात्मा संतोष चव्हाण यांच्या आठवणीने गावकऱ्यांनी रात्र काढली जागून

मंगेश शेवाळकर

हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा तांडा येथील हुतात्मा संतोष चव्हाण यांच्या आठवणीने गावकऱ्यांनी बुधवारी ( ता.१ ) संपूर्ण रात्र जागून काढली गावामध्ये चूलही पेटली नाही.

ब्राह्मणवाडा तांडा येथील संतोष चव्हाण गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंग स्फोटामध्ये हुतात्मा झाल्याचे वृत्त धडकताच हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली. हुतात्मा संतोष चव्हाण यांच्या ब्राह्मणवाडा तांडा या गावांमध्ये बुधवारी ( ता.१ ) सायंकाळपासूनच परिसरातील गावकरी व पाहुण्यांची गर्दी झाली आहे. पाच बहिणींच्या पाठीवर असलेला एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे चव्हाण कुटुंबीयांना आधार देण्यासाठी परिसरातील गावकरी ब्राह्मणवाडा तांडा या गावात दाखल झाले आहेत. मनमिळावू स्वभावाचे असलेले चव्हाण यांच्या बालपणापासूनच्या आठवणीना उजाळा दिला जाऊ लागला आहे.

हुतात्मा चव्हाण यांच्या बालपणीच्या मित्रमंडळींकडून देखील त्यांच्या स्वभावाची तसेच जिद्दीची माहिती दिली जाऊ लागली आली आहे. संपूर्ण रात्रभर शहीद संतोष चव्हाण यांच्या आठवणींनी गावकरी जागे होते. गावात चूलही पेटली नाही. गुरूवारी ( ता.२)सकाळी परिसरातून गावकरी शहीद संतोष चव्हाण यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गावात दाखल झाले आहेत. आज दुपारपर्यंत गडचिरोली येथून शहीद संतोष चव्हाण यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा तांडा येथे आणले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ब्राह्मणवाडा तांडा या सुमारे दोन ते अडीच हजार लोकसंख्येच्या गावात सध्या स्मशान शांतता आहे. प्रत्येकाचे डोळे शहीद श्री. चव्हाण यांच्या आठवणीने पाणावले जात असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT