bribe
bribe bribe
मराठवाडा

Breaking! आठ हजार रुपयांची लाच घेताना दुय्यम निरीक्षकासह जवानाला अटक

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): बियर शॉपीच्या परवाना नूतनीकरणासाठी शासकीय चलन भरुन आठ हजार रूपयाची लाच (bribe in Osmanabad) स्विकारताना उमरगा येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे दुय्यम निरीक्षक व जवानाला उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB Osmanabad) सोमवारी (ता. सात) रंगेहाथ पकडले.

याबाबतची माहिती अशी की, तक्रारदाराची बियर शॉपी आहे. परवाना नुतनीकरणासाठी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कागदपत्र दाखल केली होती. त्यासाठीचे शासकिय चलन भरले होते, मात्र नुतनीकरणाचा परवना देण्यासाठी दुय्यम निरीक्षक सुमित सुधाकर  फावडे, जवान श्‍याम किशोर राऊत यांनी आठ हजाराची रुपये लाचेची मागणी केली. ती सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात पंचांसमक्ष स्वीकारली. याबाबत उमरगा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. या कामी त्यांना पोलीस अंमलदार शिवाजी सर्जे, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

झीरो पोलीस कसा सुटला ?

येथील दारूबंदी कार्यालयात गेल्या अनेक वर्शापासुन एक झीरो पोलीस कार्यरत आहे, अनेक "व्यवहार" सांभाळून हा झिरो पोलीस ह्या कार्यवाहीतून कसा काय सुटला अशी चर्चा शहरात सुरु होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT