sharad pawar
sharad pawar 
मराठवाडा

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्ग, तेरणाचा प्रश्न सुटणार, शरद पवार यांनी दिले आश्वासन

सयाजी शेळके

उस्मानाबाद : सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्ग, तेरणा साखर कारखान्याबाबात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सकारात्मकता दाखवत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन पक्षाच्या जिल्हा शाखेला दिले आहे.

रोजगार हमीतून योजनेतून उस्मानाबाद सोलापूर रेल्वेमार्ग पूर्ण करावा, जिल्हा बँक, तेरणा कारखान्याचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी उस्मानाबाद राष्ट्रवादीच्या शिस्तमंडळाने पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्याकडे साकडे घातले होते. मुंबईत शिष्टमंडळाने सोमवारी (ता.३१) खासदार पवार यांची भेट घेहुन या मागण्या मांडल्या.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, ऍड. प्रवीण यादव आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा शाखेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजाभवानी देवस्थान रेल्वे नकाशावर यावे या करिता सोलापूर ते उस्मानाबाद या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली असून २०१९ च्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तुटपुंजी तरतूद केली होती. त्यामुळे सर्वेक्षणाच्या पुढे काहीच झाले नाही.

संपूर्ण देशात कोराना साथीच्या रोगामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामाचा जास्तीत जास्त भाग राज्य सरकारने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्याची तयारी दर्शवली,  तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा विकास प्रकल्प मार्गी लागु शकतो. या पुर्वी राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वे मार्गासाठी अशा स्वरूपाचे योगदान दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बीड जिल्ह्यातील रेल्वेसाठी जे सहकार्य केले त्याच धर्तीवर प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य सरकारला विनंतीपुर्वक सुचीत करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

तसेच तेरणा कारखान्याच्या बाबतीत देखील शेतकरी आणि कामगार अडचणीत असुन भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सामंजस्य दाखवल्यास तेरणा कारखाना पुढील हंगामात सुरु होऊ शकतो. ज्यामुळे शेतकरी, कामगार आणि जिल्हा बँकेला खुप मदत होऊ शकेल. न्यायालयीन अडचण येणार नसेल तर कारखान्याबाबत नक्की तोडगा काढता येईल, रेल्वे प्रश्नाबाबत राज्य सरकारला किती आणि कशा स्वरुपात सहभाग नोंदवता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा करण्याचे आश्वासन पक्षाचे अध्यक्ष खासदार पवार यांनी दिल्याची माहिती जिल्हा शाखेकडून देण्यात आली आहे.


(संपादन - गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT