मराठवाडा

बीडमध्ये राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा; शरद पवार यांची उपस्थिती

दत्ता देशमुख

बीड : महागाई गगनाला भिडली आहे. शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याने सरकार विरोधात असंतोष आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यात परिवर्तन अटळ आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत एक ऑक्टोबरला बीड येथे विजयी संकल्प मेळावा होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पवार ता. 30 सप्टेंबरला बीड मुक्कामी असतील. त्यांच्या हस्ते सायंकाळी एका खासगी रुग्णालयाचे उद्धाटन होईल. त्यानंतर एक ऑक्टोबरला दुपारी मेळावा होणार आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारी सभा बीडच्या यापूर्वी झालेल्या सर्व सभांचे गर्दीचे विक्रम मोडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा व राज्यातील विविध प्रश्नांवर पवार या सभेत भाष्य करतील असे धनंजय मुंडे म्हणाले. पाऊस नसल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. पंचनामे करण्याची, टंचाईमुळे टॅंकर सुरु करण्याची आम्ही मागणी केली होती. मात्र, दोन्ही गोष्टी अद्याप झाल्या नसल्याचे ते म्हणाले. सध्या मुग व उडदाचे उत्पादन झाले आहे. मात्र, व्यापारी संपावर असल्याने विकायचे कोठे असा प्रश्न आहे.

मागच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महागाईच्या विरोधात भाषणे करत होते. मात्र, आता महागाई गगनाला भीडली आहे. पेट्रोल लवकरच शंभर रुपये होईल आणि डिझेलचा दरही तेवढाच होईल. तर, गॅस सिलेंडर हजार रुपयांना होईल. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, सय्यद सलिम, राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रविंद्र क्षीरसागर, डी. बी. बागल, संदीप क्षीरसागर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT