Shivaji Jadhav
Shivaji Jadhav 
मराठवाडा

गिरीश महाजनांची शिष्टाई अपयशी; शिवाजी जाधव अपक्ष म्हणून लढणार

मंगेश शेवाळकर

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते ऍड. शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न भाजपाकडून केले जात आहे. मंगळवारी ( ता. २६ ) रात्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा तब्बल पंचवीस मिनिट दूरध्वनीवरून संपर्क साधून अॅड. जाधवांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना अपयश आले आहे.

हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाकडून ऍड. शिवाजी जाधव यांनी मागील दोन वर्षापासून तयारी सुरू केली होती. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला. भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत देत त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मात्र शिवसेना भाजप युती झाल्यामुळे हिंगोलीची जागा शिवसेनेकडे कायम राहिली. त्यामुळे मागील दोन वर्षापासून लोकसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या जाधव यांची मोठी अडचण झाली.

पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जाधव यांनी मंगळवार (ता. २६ ) शक्तिप्रदर्शन करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सुमारे 25 मिनिट बातचीत केली. यामध्ये महाजन यांनी जाधव यांची मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्यानंतरही उमेदवारी का दिली गेली नाही असा सवाल उपस्थित करून जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला. महाजन यांची शिष्टाई अपयशी झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही जाधव यांच्याशी संपर्क साधून उमेदवारी मागे घेण्याबाबत कळविले. मात्र आपण घेतलेला निर्णय योग्यच असून कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही असे जाधव यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यामुळे भाजप नेत्यांची शिष्टाई  आता हिंगोली लोकसभा मतदारसंघात अपयशी ठरणार असल्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT