file photo 
मराठवाडा

धक्कादायक- का केला आई- वडिलावर मुलाने चाकुने हल्ला...वाचा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : माझे लग्न का करीत नाहीत या कारणावरून पुत्रानेच वाद घालून डॉक्टर पीता व मातेवर चाकू हल्ला केल्याची घटना रविवारी (ता. १६) रोजी दुपारी विवेकनगर येथे घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून भाग्यनगर पोलिसांनी पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

शहराच्या विवेकनगरमध्ये राहणारे डॉ. संजय सखाराम लाठकर व त्यांची पत्नी हे रविवारी (ता. १६) दुपारी चारच्या सुमारास घरी होते. यावेळी त्यांच्याजवळ जावून मुलगा वल्लभ लाठकर (वय २८) याने तुम्ही माझे लग्न का करत नाही असे म्हणून वाद घातला. आई- वडिलांना शिविगाळ करून तो एवढ्यावरच न थांबता त्याने घरातील भाजी कापण्याचा चाकु हातात घेऊन वडिलावर हल्ला केला. वडिलाच्या छातीवर चाकुने मारून जखमी केल्यानंतर त्याला आई धरण्याचा प्रयत्न करत असताना वल्लभ याने आईवरही चाकु हल्ला केला. यात आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिला कानाच्या मागे मानेवर जबर मार लागला. वल्लभ याने रागाच्या भरात घरातील सामानाची आदळआपट केली. 

मुलावर गुन्हा दाखल

या घटनेनंतर विवेकनगर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. या प्रकरणाची माहिती भाग्यनगर पोलिसांना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी अवस्थेतील डॉक्टर दाम्पत्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास डॉ. संजय लाठकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिसांनी वल्लभ लाठकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक के. एन. सांगळे करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: क्षुल्लक कारणावरून वाद; आधी शिर धडापासून वेगळं केलं, नंतर फुटबॉलसारखी लाथ मारत राहिला, व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

PAK vs OMN : पाकिस्तानचा हा संघ भारताविरुद्ध खेळणार आहे का? ओमानविरुद्धचा खेळ पाहून उडवली जातेय खिल्ली...

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

Latest Marathi News Updates Live : अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT