प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र 
मराठवाडा

नाल्यात पडून बहीण-भावाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

शिरूर अनंतपाळ(जि. लातूर)  : निटूर (ता. निलंगा) येथील ग्रामपंचायतीने गावाजवळ खोदलेल्या नाल्यात पडून बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 15) घडली. अदिल महेबूब फकीर (वय 5), जोया महेबूब फकीर (7) अशी मृत भाऊ-बहिणीची नावे आहेत. 


निटूरमधील महेबूब इस्माईल फकीर यांची ही मुले सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. सकाळी अकरापर्यंतही ती घरी न परतल्याने घरच्यांनी शोध सुरू केला. ग्रामपंचायतने खोदलेल्या नाल्याच्या जवळ मुलांच्या चपला आढळल्या. नाल्यात दोघांचे मृतदेह सापडले. 


या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी दोन्हीही मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवले.

निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करून दोषींवर कारवाईची मागणी केली. रक्षाबंधन सणाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT