Abdul Sattar
Abdul Sattar sakal
मराठवाडा

Sillod News : सिल्लोड-सोयगाव बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तारांचे एकहाती वर्चस्व; सर्व १८ उमेदवार विजयी

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड - सिल्लोड-सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बाजार समितीची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वातील जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनेलने भाजप पुरस्कृत श्री सिद्धेश्वर-मुर्डेश्वर शेतकरी परिवर्तन सहकार विकास पॅनलला व्हाईट वॉश देत सर्व अठरा जागांवर विजय मिळविला आहे.

रविवारी झालेल्या मतदानाची टक्केवारी बघता निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. सकाळी नऊ वाजेपासून मतमोजणीस शहरातील शेवंताबाई मंगल कार्यालयात सुरूवात झाली. यावेळी सर्वात पहिला निकाल हमाल व तोलारी मतदारसंघाचा घोषित झाला.

यामध्ये श्री. सत्तार यांच्या पॅनेलच्या उमेदवाराने मोठ्या लीडने विजय मिळविला. त्यानंतर मात्र सहकारी संस्था मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदार संघ, व्यापारी मतदार संघाची मतमोजणी संथ गतीने सुरू होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास चित्र स्पष्ट होऊन सत्तारांच्या नेतृत्वातील पॅनेलने जोरदार मुसंडी मारित सर्वच्या सर्व अठरा जागांवर विजय संपादन केल्यामुळे बाजार समितीची एकहाती सत्ता पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार यांनी काबीज केली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप जैस्वाल यांनी निकाल घोषित केला. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शेषराव उदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निकाल घोषित होताच मंत्री अब्दुल सत्तार समर्थकांसह मतमोजणीच्या स्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. विजयी उमेदवारांसह मंत्री सत्तार यांची मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते.

सहकारी संस्था मतदार संघ

केशवराव तायडे - 762

दामोदर गव्हाणे - 746

प्रभाकर काळे - 743

जयराम चिंचपुरे - 726

श्रीरंग साळवे - 723

अरूण शिंदे - 721

सुनिल पाटणी - 677

अनुसयाबाई मोरे - 820

शालीनी रहाटे - 761

नंदकिशोर सहारे - 812

सतीष ताठे - 775

ग्रामपंचायत मतदार संघ

दारासिंग चव्हाण - 775

विश्वास दाभाडे - 755

राजाराम पाडळे - 769

संदीप राऊत - 793

व्यापारी मतदार संघ

रमेश लाठी - 633

भावराव लोखंडे - 578

हमाल व तोलारी मतदारसंघ

शेख जावेद शे.जहीर - 877

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT