The silver festival of the Babasaheb Paranjape Foundation was celebrated
The silver festival of the Babasaheb Paranjape Foundation was celebrated 
मराठवाडा

मिसेस गांधींची हत्या तशीच झाली नाही का ?

सुशांत सांगवे

लातूर : लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष असताना काळ्या लोकांवर लादलेली गुलामगिरी त्यांनी नष्ट केली. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले दक्षिणेतील आणि कारखानदारीवर अवलंबून असलेले उत्तरेकडील लोकांमध्ये लढाई पुकारली गेली; पण ती वेळीच लिंकन यांनी हाणून पाडत देशाला एक ठेवले. याचा राग मनात ठेवून काहींनी लिंकन यांच्या पाठीत खंजीर खुपसला. तशीच हत्या आपल्याकडे मिसेस गांधी यांची झाली नाही का, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी येथे उपस्थित केला.

बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या रौप्य महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात हैदराबाद मुक्ती लढ्यातील शौर्यगाथेवर आधारित 'अग्निपथ' या स्मरणिकेचे आणि स्मृतिग्रंथाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. आपल्याच नव्हे वेगवेगळ्या देशांत झालेल्या लढ्यांतून खूप काही शिकण्यासारखे आहे असे सांगून पाटील यांनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येचा उल्लेख केला.

महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यात महात्मा गांधींची हत्या झाली. त्यांची दूरदृष्टी हत्येला कारणीभूत ठरली, असे म्हंटले जाते. वेगळे होताना 50 करोड पाकिस्तानला देण्याच्या ठरावाला त्यांनी पाठींबा दिला होता. गांधी असे कसे करू शकतात, म्हटले गेले आणि त्यांची हत्या झाली. तमिळनाडूचा भाग घेऊन दुसरा देश निर्माण करण्याचा विचार हाणून पाडला म्हणून राजीव गांधींची हत्या झाली. म्हणून आपल्या देशाला वाचवायचे असेल तर प्रांतवाद, भाषाद्वेष याच्याविरोधात झाले पाहिजे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. धार्मिक-जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि एकता कायम राहील याकडे पाहिले पाहिजे, असेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, महापौर सुरेश पवार, माजी खासदार जनार्दन वाघमारे, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष व्यंकटेश काब्दे, समाजवादी नेते मनोहर गोमारे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, धनंजय पाटील उपस्थित होते. हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झालेले मुर्ग्याप्पा खुमसे, जीवनधर शहरकर, मल्लिकार्जुन दुमने या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT