file photo
file photo 
मराठवाडा

कामचुकार पोलिस निलंबीत

प्रल्हाद कांबळे


नांदेड : अयोध्या प्रकरणी अती महत्वाच्या बंदोबस्तात कामचुकारपणा करणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस निरीक्षकाच्या अहवालावरून निलंबीत केले आहे. श्री. मगर यांचा हा पहिला झटका असल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  

रामजन्मभूमी व बाबरी मशीद वाद संबंधाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शनिवारी (ता. नऊ) सकाळी येणार होता. त्यामुळे शहर व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी चोख बंदोबस्त लावला होता. परंतु या अत्यंत महत्वाच्या बंदोबस्तात दिलेले कर्तव्य पार न पाडता त्या दिवशी साध्या गणवेशामध्ये पोलिस ठाण्यात आलेला पोलिस नाईक रामराव धरमसिंग राठोड (ब. न. २५१३) याला चांगलाच भोवला. फिक्स पॉईन्टवर दिलेल्या कर्तव्य ठिकाणी तो पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्या तपासणीत गैरहजर आढळला. श्री. मगर यांनी पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप काकडे यांना अहवाल मागविला. श्री. काकडे यांच्या अहवालावरून पोलिस अधिक्षक श्री. मगर यांनी कामचुकार पोलिस रामराव राठोड याला निलंबीत केले आहे. पोलिस अधिक्षक श्री. मगर यांच्या या निर्णयामुळे पोलिस दलातील कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे. 

हे ही वाचा 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खांबेगाव (ता. लोहा) शिवारात शनिवारी (ता. नऊ) सायंकाळी घडली. 

लोहा तालुक्यातील खांबेगाव येथील शेतकरी गजानन वसंत शिंदे (वय ३५) यांच्या शेतावर मागील काही दिवसांपासून सतत नापिकी होत होती. त्यातच त्याने लोहा येथील देना बँक शाखेतून अडीच लाखाचे कर्ज काढले. यावर्षीही त्याने आपल्या शेतात पेरणी केली. मात्र पावसाने होत नव्हते पिक गेल. यामुळे तो अधिकच खचला. घरगाडा चालविण्यासाठी त्याने पुन्हा खासगी कर्ज काढले. मात्र हाताला काम नाही व शेतातील उत्पन्न घटल्याने ते हताश झाले. कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने त्याने अखेर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

शनिवारी सायंकाळी ते खांबेगाव शिवारात एकटेच गेले. संसाराचा व मुलाबाळाचा कुठलाच विचार न करता आपल्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी या घटनेची माहिती लोहा पोलिसांनाही देण्यात आली. फौजदार श्री. राठोड हे आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरविला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह लोहा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणाची माहिती संतोष वसंत शिंदे यांच्या माहितीवरुन लोहा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार श्री. राठोड करित आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT