मंठा : बाजारपेठेत सोयाबीन विक्रीकरिता देताना शेतकरी.
मंठा : बाजारपेठेत सोयाबीन विक्रीकरिता देताना शेतकरी.  
मराठवाडा

शेतकऱ्यांकडून मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री 

कृष्णा भावसार

मंठा (जि. जालना) - सणासुदीचे दिवस, त्यातच शेतमजुरांची काढणीसाठीची मजुरी देण्यासाठी शेतकरी सध्या मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करीत आहेत. ओलसरपणाचे कारण देत सोयाबीनला भावही कमी मिळत आहे, शिवाय सोयाबीन वाळत घालण्यासह स्वच्छ करण्यासाठीही व्यापाऱ्यांना कष्ट घ्यावे लागत आहेत. 

ग्रामीण भागात सोयाबीन काढणीच्या कामाने आता वेग घेतला आहे. ठिकठिकाणी वादळी वारे व पाऊस पडत असल्याने शेतकरी जास्तीची मजुरी देऊन सोयाबीनची काढणी करीत आहे. काढणीची मजुरी देण्याकरिता अनेक शेतकरी सोयाबीन ओली असतानाच मळणी करीत आहेत. त्यानंतर तत्काळ बाजारपेठेत आणून मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करीत आहे. सोयाबीन काढणीकरिता एकरी तीन हजार रुपये व मळणी यंत्राची एक क्विंटल सोयाबीन काढण्याकरिता तीनशे रुपये द्यावे लागत आहे. तालुक्‍यात भारी शेती असलेल्या ठिकाणी एकरी पाच ते सात क्विंटल, तर हलक्‍या शेतात तीन ते पाच क्विंटल उत्पादन होत आहे. 
तालुक्‍यातील शेतकरी मागील चार वर्षांपासून दुष्काळी झळा सोशीत असून, पीक कर्जमाफी व नवीन पीककर्जाच्या गोंधळात आतापर्यंत त्रस्त झाला आहे. मागील वर्षी खरिपासह रब्बीचे पीक पूर्णपणे हातचे गेले तरी देखील शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. दुष्काळातून मंठा तालुका वगळला गेला. खासगी देणी वाढतच आहेत. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याने मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मागील आठवड्यात सोयाबीनची आवक कमी असताना 3 हजार 700 ते 3 हजार 900 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनला भाव मिळाला; परंतु सोयाबीनची आवक वाढल्याने शुक्रवारी (ता. 11) मंठा बाजारपेठेत सोयाबीन जास्त ओली असल्याचे कारण सांगून व्यापाऱ्यांनी सोयाबीनची खरेदी 2 हजार 800 ते 3 हजार 400 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी केली, तसेच क्विंटलमागे दोन किलो कटती काटली आहे. बाजारात शनिवारीही (ता. 12) अशीच स्थिती होती. 
शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होईल याची खात्री नाही. सुरू होईल त्यावेळी शेतकऱ्यांकडे शेतीमाल शिल्लक राहील याची शाश्‍वती नाही. परिणाम हमीभाव खरेदीचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही. 

ठोक बाजारपेठेत सोयाबीनचे भाव प्रतिक्‍विंटलमागे तीनशे रुपयांनी उतरलेले आहेत. त्यातच बाजारात ओली सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. एकूण सर्व बाबींचा विचार करून सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. 
विलास उन्हाळे, 
अडत व्यापारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT