Sagroli Photo (2).jpg 
मराठवाडा

सगरोळीत जंतूनाशक औषध फवारणी

अभिजीत महाजन


सगरोळी, (ता. बिलोली, जि. नांदेड) ः कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सगरोळी (ता.बिलोली) येथे संपूर्ण गावात कोरोना सारखा गंभीर आजार पसरू नये यासाठी येथील ग्राम पंचायततर्फे जंतू नाशक औषध फवारणी करण्यात आली.


महाराष्ट्रात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेसह सर्व विभाग देखील अलर्ट झाले असून सर्वत्र उपाययोजना राबविल्या जात आहेत सगरोळी (ता. बिलोली) येथील ग्राम पंचायातीनेही पुढाकार घेऊन खबरदारीसाठी येथील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, गावातील प्रत्येक गल्ली व रस्त्यावर जंतू नाशक औषध फवारणी करण्यात आली.


स्वच्छता राखावी असे आवाहन
प्रशासनाच्या आदेशानुसार दुधविक्री, किराणा साहित्य, औषधी दुकाने व भाजीपाला विक्री ठराविक वेळेत चालू आहे परंतु याठिकाणी नागरिक ठराविक अंतर ठेवत नसल्याचे निदर्शनास येत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच प्रतिनिधी व्यंकट पाटील सिद्नोड व उपसरपंच रोहित देशमुख यांनी, नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडल्यानंतर सोशल डीस्टन्सिंग ठेवावे व यासह नागरिकांनी स्वच्छता राखावी असे आवाहन केले आहे.


घरपोच भाजीपाला
सगरोळी येथे दर बुधवारी आठवडी बाजार भरतो याबाजारात भाजीपाला विक्री मोठ्या पमाणात होते. सगरोळीसह पंचक्रोशीतील नागरिक भाजीपाला खरेदीसाठी येतात परंतु लॉक डाऊनमुळे मागील तीन बुधवार येथे बाजार भरला नसल्याने नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी मोठी पंचायत निर्माण झाली होती. परंतु येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे योग्यादरात संपूर्ण भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. ठराविक दिवस व वेळेत भाजीपाला विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा मेसेज व्हाट्सअॅपद्वारे कळविला जात असून त्यानुसार नागरिक भाजीपाला खरेदी करीत आहेत. या वेळी नागरिकांमध्ये ठराविक अंतर ठेवले जात आहे. येथील किरकोळ भाजी विक्रेते व भाजीपाला उत्पादक शेतकरी हे घरपोच भाजीपाला पुरवत आहेत.


किराणा साहित्य घरपोच
येथील काही किराणा दुकानदारांतर्फे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी घरपोच किराणा साहित्य पोचविले जात आहे. व्हाट्सअॅपवर साहित्याची यादी पाठविल्यानंतर संपूर्ण साहित्य घरपोच मिळत आहे. किराणा व दुध या जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळत असल्याने बाजारातील गर्दी टाळली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोठी कारवाई! ४ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

Mumbai News: मुंबईत वाहतुकीत बदल! 'या' मार्गावर प्रवेशबंदी, 'असे' असतील पर्यायी मार्ग

मित्राची बहीण म्हणून आधी काही बोललो नाही पण... प्रसाद जवादेने सांगितली त्यांची लव्हस्टोरी; म्हणाला, 'मी तिला किती वेळा विचारलं'

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी’साठी मिळाली स्थगिती; लाभार्थी महिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास, सरकारचे महिलांकडून आभार

Latest Marathi News Live Update : पुणे दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई, एक जणाला अटक

SCROLL FOR NEXT