10 th exam
10 th exam 10 th exam
मराठवाडा

दहावीच्या मूल्यमापनाबाबत संभ्रम दूर करण्यासाठी बोर्डाकडून हेल्पलाइन

संदीप लांडगे

औरंगाबाद: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. या कार्यपद्धतीसंदर्भात असलेल्या अडचणी तसेच शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळाकडून हेल्पलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. त्यानंतर मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली.

२०२०-२१ शैक्षणिक वर्षात आयोजित करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परीक्षार्थी यांच्या मूल्यमापनाबाबतचा तपशील व विषयनिहाय परिशिष्टे. याबाबतचे परिपत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तसेच मूल्यमापन कार्यपद्धतीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार मंडळाचे सहसचिव, सहायक सचिव तसेच अन्य अधिकारी संबंधितांना मार्गदर्शन करणार आहेत. औरंगाबाद विभागीय मंडळाकडून हेल्पलाइनसाठी सहसचिव राजेंद्र पाटील- ९९२२९००८२५, ९४२१३३६८०१ व वरिष्ठ अधीक्षक आर.आर. गर्गे- ९४२३४६९७१२ यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT