मराठवाडा

स्वस्त विमान कंपन्यांना औरंगाबादसाठी प्रस्ताव द्या!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - अजिंठा आणि वेरूळ या जगप्रसिद्ध लेण्यांसह या भागात असलेल्या अन्य पर्यटनस्थळांचे अधिक प्रभावीपणे ‘प्रमोशन’ व्हायला हवे. पर्यटनवृद्धीसाठी ज्या विमान कंपन्यांची थेट सेवा अपेक्षित आहे त्यांच्यासह स्वस्त सेवा देणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधा, त्या लवचिक असतात. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्यांना प्रस्ताव द्या, असा सल्ला थायलंडचे राजदूत चूटिंटोर्न गोंदसाकदी यांनी ट्‌विटरद्वारे दिला.

अजिंठा आणि वेरूळ लेण्या पाहण्यासाठी चूटिंटोर्न गोंदसाकदी औरंगाबादेत आले होते. त्यांना औरंगाबादसाठी थायलंडमधून थेट विमानसेवा सुरू करण्यासाबाबत विनंती करण्यात आली. या विषयावर ट्‌विटवर झालेल्या संवादात त्यांनी औरंगाबाद आणि परिसरातील पर्यटन वृद्धीसाठी चार पर्याय सुचविले आहेत. यात पायाभूत सुविधांपासून विमानसेवेपर्यंत त्यांनी आपल्या मनातील गोष्टी औरंगाबादकरांना सांगितल्या. औरंगाबादेतून विमानतळ प्राधिकरणातर्फे देण्यात आलेल्या प्रस्तावातून थायलंडमधून औरंगाबादसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करावी, अशी विनंती करण्यात आली असल्याची माहिती ट्विटरहून त्यांना देण्यात आली. त्यावर उत्तर देत औरंगाबादेत पर्यटन क्षेत्राची वृद्धी होण्यासाठी चूटिंटोर्न सॅम यांनी उपाय सुचविले.

अजिंठ्यासाठी लागतात तीन तास 
अजिंठा लेणीकडे जाणारा मार्ग असलेल्या औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर चालणाऱ्या वाहनांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. औरंगाबाद ते अजिंठा लेणी हा १०० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तीन तासांपेक्षा आधिक वेळ लागत असल्याने पर्यटकांची गणिते चुकतात आणि अन्य पर्यटन स्थळांवर जाण्याचा त्यांना ठरलेला बेत बदलावा लागत असल्याचे सध्या चित्र आहे.

सुचविलेले उपाय 
१. रस्ते सुधारा.
२. येथे ज्या विमानसेवा हव्या आहेत, त्यांना टार्गेट करा. यामध्ये स्वस्त एअरलाइन्सचा विचार व्हावा, कारण त्यांच्यात लवचिकता असते, असे मला वाटते. 
३. याला व्यावसायिक विषय बनवा आणि त्या कंपन्यांशी संवाद साधा. 
४. अजिंठा आणि वेरूळ लेण्या या पाहण्याजोग्याच आहेत. त्यांच्यासह, अन्य पर्यटनस्थळांचे प्रमोशन हवे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT