Sugar
Sugar 
मराठवाडा

राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी दांडेगावकर

सकाळवृत्तसेवा

वसमत - राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, तर उपाध्यक्षपदी श्रीराम शेटे, आबासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

मुंबई येथे साखर संकुलात मंगळवारी संचालकांची बैठक झाली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आदींसह संचालक उपस्थित होते.

वसमत (जि. हिंगोली) येथील पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या दांडेगावकर यांचा सहकार क्षेत्रात चांगला दबदबा आहे. साखर कारखानदारी अडचणीत असतानाही काटकसरीचे धोरण राबवून त्यांनी "पूर्णा'सह बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना (जवळाबाजार, ता. औंढा) चालविण्यास घेतला. दोन्ही कारखान्यांचे व्यवस्थापन यशस्वीपणे करून दाखविले आहे. कारखानदारी यशस्वीपणे सुरू ठेवण्यासाठी उपपदार्थ निमिर्तीही केली पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी "पूर्णा'द्वारे वीजनिर्मिती प्रकल्प, इथेनॉल, डिस्टलरी प्रकल्पदेखील सुरू केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT