भोकरदन : बसस्थानकात दोरीवरचा जीवघेणा खेळ दाखविताना चिमुकली मुस्कान.
 भोकरदन : बसस्थानकात दोरीवरचा जीवघेणा खेळ दाखविताना चिमुकली मुस्कान. 
मराठवाडा

दोरीवरच्या कसरतीत हरवलेली 'मुस्कान' 

दीपक सोळंके

भोकरदन - शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपणे बागडण्याच्या वयातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी उचलत दोरीवर कसरतीचे खेळ करून पैसे कमाविण्याची वेळ मुस्कानवर आली आहे. याच खेळाच्या भरवशावर कुटुंबाला दोनवेळचे अन्न मिळेल म्हणून तिने तिचे बालपण हरविले आहे. 

हाताला काम नसल्याने आपले बिऱ्हाड घेऊन छत्तीसगड राज्यातील एका छोट्याशा गावातून अजयकुमार तेवर हा तरुण त्याची पत्नी व लहान मुलांसह पोटाची खळगी भरण्यासाठी दोरीवरचा खेळ दाखवून गावोगावी भटकंती करीत आहे. काही दिवसांपासून तो तालुक्‍यात वास्तव्यास असून, शहरात शनिवारी (ता. सात) आठवडे बाजार असल्याने चार पैसे जास्त मिळेल या आशेने त्याने दोरीचा खेळ बाजारात ठिकठिकाणी सादर केला.

अवघ्या आठ वर्षांच्या मुस्कानने दोरीवर चालण्याच्या चित्तथरारक कसरत केली. शिकण्याच्या, खेळण्याच्या वयात ती स्वतःच्या जिवाची बाजी लावत आपल्या कुटुंबाचा आधारवड बनली आहे. 

पोटाची आग खूप मोठी असते. याच टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःचे घर व गाव सोडून भटकंती करावी लागत आहे. आम्हालाही मुलांना शिकवावे वाटते; परंतु कुटुंबाचा उदरनिर्वाह एका जागी राहून होत नाही. 
- अजयकुमार तेवर, 
मुस्कानचे वडील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT