Sugar-Factory
Sugar-Factory 
मराठवाडा

उसाचे क्षेत्र घटले

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद - जिल्ह्यात ऊस क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. सततचा दुष्काळ अन्‌ खालावलेल्या पाणीपातळीमुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र कमी होताना दिसत आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने ऊस मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यंदाही पावसाचे प्रमाण कमीच असल्याने शेतकरी ऊसलागवड करणार नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठा मुबलक होता. जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला झाली की, उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढते. तसे गेल्यावर्षीही ते वाढले होते; पण त्यानंतर पावसाने दिलेली हुलकावणी साखर उद्योगाला अडचणीत आणणारी ठरली आहे. साहजिकच शेतकऱ्यांना देखील त्याचा फटका बसलेला दिसून येत आहे. ऊस पिकातून शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळत असल्याने त्या पिकाला त्यांची अधिक पसंती असते.

गेल्यावर्षी जवळपास पन्नास हजार हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली होती. साहजिकच शिल्लक उसाचा प्रश्‍नसुद्धा गेल्यावर्षी जाणवल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. हंगाम सुरू झाल्यानंतर पाण्याची उपलब्धता नसल्याने शेतकऱ्यांना ऊस लवकर घालण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातही शेतकऱ्यांना उसाला भावदेखील कमी मिळाल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र होते. 

या सर्वच कारणांमुळे उसाच्या क्षेत्रात निम्म्याहून अधिक क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. यंदा उसाचे क्षेत्र २० हजार हेक्‍टरच्या जवळपास राहिल्याचे दिसून येत आहे. अजूनही यामध्ये घट होईल असे तज्ज्ञाचे मत असून पुढील वर्षी कारखान्यांना शेतकऱ्यांच्या मागे लागण्याची वेळ येईल असे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांकडेच आता उसाचे पीक दिसणार असून इतर लोकांना मात्र अन्य पिकाकडे वळावे लागणार आहे. कारखान्यासमोर यंदा मोठ्या अडचणी येणार आहेत, उसाचे क्षेत्र घटल्याने उसाच्या पळवापळवीचे प्रकार यंदा पाहायला मिळतील अशीही शक्‍यता आहे. त्यातही किती साखर कारखाने यंदा हंगामात चालू राहतील हीच मोठी शंका आता निर्माण होत आहे.
यावर्षी पावसाने जुलैचा पहिला आठवडा झाला तरी हजेरी लावलेली नाही.

तुरळक पावसाने हजेरी लावलेली असली तरी त्याने पेरणीसुद्धा होईल अशी स्थिती नाही. त्यामुळे उसासहित अन्य पिकांचे उत्पादन घेणेसुद्धा कठीण होते की काय, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT