मराठवाडा

खासदारकी सोडून सहा महिने काश्‍मिरला जावे वाटते : सुप्रिया सुळे

अतुल पाटील

औरंगाबाद : मला दोन गोष्टी करायची इच्छा होतेय. सोडून द्यावी ही खासदारकी. कपडे बांधावेत, पॅक करावीत आणि जम्मू काश्‍मिरला सहा महिने जाऊन रहावे. कि काय प्रॉब्लेम आहे सांगा, आपण सगळे बसू. प्रेमाने मार्ग काढू. अशी उद्विग्न भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्‍त केली. औरंगाबादेत मुप्टा संघटनेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्‍त करताना सुळे म्हणाल्या, काय बोलतात बघा, हे आमचे सत्तेतले लोकं. कि आयांना सांगतात मुलांकडून बंदुक काढून घ्या. मला एक सांगा या देशातली नव्हे जगातली कुठली आई बंदुक घे म्हणून मुलाला सांगते. मला आश्‍चर्य वाटते या सत्तेतल्या लोकांचे. आता सुप्रिया सुळे काही बोलू शकते पण, बारामती खासदार काय नाय बोलू शकत. माझ्यावर जबाबदारी आहे, इच्छा असली तर बोलता येत नाही. मेघालयचे गर्व्हनर काय म्हंटले, काश्‍मिरी वस्तु विकत घेऊ नका. तुम्हाला चालेल? औरंगाबादला दंगल झाली. मी आले अन्‌ म्हटले अरे बाबा नको ते औरंगाबाद. त्यांच्या वस्तु नको आपल्याला. हे फक्‍त भांडणेच करतात. म्हणजे आणखी मी तेल ओतणार. तुम्हाला दुखवून जाणार. कशासाठी करायचे असे. 

पुलवामा घटनेनंतर, आम्ही वाट पाहत होतो प्रधानमंत्री काय बोलतात का? त्यादिवशीच गोष्ट पहा. काश्‍मिरची घटना झाली. दुसऱ्या दिवशी यवतमाळला मिटींग होती. प्रधानमंत्र्यांनी तारीख दिली होती. येणे सहाजिक आहे. मला तुम्ही एक मिनिट विचार करुन सांगा कि, तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या जागेवर असता, तर तुम्ही देशाची सर्वपक्षीय मिटींगमध्ये सहभागी झाला असता कि, यवतमाळला गेले असता. तिथे मुख्यमंत्री होते, नितीन गडकरी होते. तुम्हाला माहित आहे मोदी यांना तंत्रज्ञानाची भारी हौस आहे. त्यांना बुथ कमिटी पासून व्हिडिओ कॉन्फरन्सची हौस आहे. यवतमाळला व्हिडिओ कॉन्फरन्स करु शकत नव्हते? मी म्हणते कि कार्यक्रम रद्द करु नका, गरीब महिलांना मदत होत असेल तर कशाला उशीर. मदत झाली का नाही हे माहित नाही. तिकडे एक बिचारी मुलगी गेली. पाणी नसल्याने. त्यामुळे कुठल्या गोष्टी कधी प्राधान्य द्यायचे. प्रचार करायचा कि देशाची सुरक्षितता. इलेक्‍शन येतात जातात. हरतो जिंकतो. माझा देश पहिला येतो. इलेक्‍शन पहिले येत नाही. हा संवेदनशीलपणा या सरकारमध्ये कुठेतरी कमी आहे म्हणून शिक्षणाची धोरणे अशी आहेत. प्रचाराशिवाय त्यांना काही सूचतच नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT