मराठवाडा

औरंगाबाद : तलाठी भरतीसंदर्भात दोन महिन्यांत निर्णय घ्या

सुषेन जाधव

औरंगाबाद : नगर जिह्यातील तलाठी भरतीसंदर्भात दोन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिला. प्रतिक्षा यादीतील महेशकुमार साठे यांनी अ‍ॅड. संदिप रामनाथ आंधळे यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. त्यानुसार, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१५ साली तलाठी पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतली होती. या परीक्षेत अर्जदाराने खुला (प्रकल्पग्रस्त) प्रवर्गातून परीक्षा दिली. या परीक्षेत अर्जदाराच्या प्रवर्गातून अनिरुद्ध गव्हाणे याची निवड करण्यात आली. मात्र, या निवडीविरोधात डी. जी. घुले आणि आर. बी. गव्हाणे या दोन उमेदवारांनी तक्रार अर्ज दिला.

निवड झालेला अनिरुद्ध गव्हाणे याच्या जागेवर त्याच्या भावाने डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याआधारे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली. आरोपीने डमी उमेदवाराद्वारे परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा प्रशासनाने अनिरुद्ध गव्हाणे याची निवड रद्द केली. त्यानंतर प्रतिक्षा यादीत असणाऱ्या अर्जदाराने प्रशासनाकडे न्यायालयीन प्रक्रियेच्या अधिन राहून तलाठी पदी नेमणुक करण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत प्रशासनाने त्यांचा अर्ज नामंजूर केला. सुनावणीअंती मॅटने जिल्हाधिकाऱ्यांना दोन महिन्यांत तलाठी भरतीसंदर्भात निर्णय घेण्याचा आदेश दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT