Theft
Theft 
मराठवाडा

पाहुणाच निघाला चोर

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - कामाच्या बहाण्याने औरंगाबादेतील नातेवाइकांकडे आला. मुक्कामही केला; पण जाताना साडेसात तोळे सोन्याचे दागिने घेऊन गेला. हा प्रकार उघड होताच गुन्ह्याची नोंद झाली आणि पोलिसांनी श्रीरामपूर गाठून चोरी करणाऱ्या पाहुण्याला संशयावरून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता. १९) करण्यात आली. 

मकरंद आहेर (रा. श्रीरामपूर, जि. नगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. जवाहरनगर भागात पस्तीसवर्षीय महिला राहते. मंगळवारी (ता. १६) नातेवाईक असलेला आहेर हा त्यांच्या घरी आला. मुक्काम आणि पाहुणचारही झाला; पण कपाटातील दागिन्यांवर आहेरची नजर गेली.

घरमालकाच्या नकळत आहेरने घरातील प्लायवूडच्या कपाटातील एका कप्प्यात ठेवलेले पाच तोळ्यांचा हार, दोन तोळ्यांच्या बांगड्या व पाच ग्रॅमचे टॉप्स लंपास केले आणि त्यानंतर गावाकडे धूम ठोकली. कपाटातील कप्प्यात दागिने नसल्याची बाब लक्षात येताच महिलेचा संशय बळावला.

महिलेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यात आहेरविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे व त्यांच्या पथकाने तपास केला. दुसरीकडे नातेवाईक महिला आपल्याविरुद्ध तक्रार देणार नाही आणि पोलिस आपल्यापर्यंत पोचणार नाहीत, असा फाजील आत्मविश्‍वास आहेरचा होता; पण पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला श्रीरामपूर येथून अटक केली. 

चूक घडल्याची कबुली
अटकेनंतर पोलिसांनी मकरंद आहेरची चौकशी केली. त्यावेळी ‘आपल्या हातून चूक घडली,’ अशी कबुली त्याने दिली. त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने जप्त केल्याची माहिती सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी दिली.

सोमवारपर्यंत पोलिसांचा पाहुणचार 
मकरंद आहेर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी त्याला सोमवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT