crime news.jpg
crime news.jpg 
मराठवाडा

निलंग्यात चोरांचा धुमाकूळ! गाडीच्या डिक्कीतून 2 लाख रुपये लंपास; 10 दिवसांतील तिसरी चोरी

राम काळगे

निलंगा (लातूर): अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (ता. 5) रोजी दुपारी एका निवृत्त शिक्षकाच्या मोटारसायकलची डिक्की फोडून दोन लाख लंपास केले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बुलढाणा अर्बन बँंकेसमोर सेवानिवृत शिक्षक मोहन चवन हिप्परगे र(तळीखेड) यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.२४ ए.एम.७०४८ उभी केली होती. भरदुपारी 12.30 वाजता चोरट्याने लक्ष ठेवून डिक्की फोडून त्यातील दोन लाख रूपये लंपास केले. याबाबत मोहन चवन हीप्परगे यांनी निलंगा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एक लाख वाचले-
या सेवानिवृत्त शिक्षकाने शेतीकामासाठी एकूण तीन लाख बँकेतून काढले होते. त्यातील एक लाख रूपये जवळ ठेवले होते आणि दोन लाख रूपये मोटारसायकलच्या डिक्कीत. एक लाख रूपये जवळ खिशामध्ये ठेवल्यामुळे निदान ते तर पैसे वाचले आहेत.

मागील 10 दिवसांतील चोरीची ही तिसरी घटना आहे. अमरावतीवरून उधारी वसूलीसाठी आलेले कपड्याच्या व्यापाऱ्याची कारमधून दिवसा ढवळ्या पळविली होती. तर शहरातीलच एका पीग्मी एज्टंला लूटल्याची घटनाही ताजी होती. अशातच एका सेवानिवृत शिक्षकाच्या मोटारसायकलची डिक्की फोडून २ लाख रूपये लंपास केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात चोरींचे प्रमाण वाढल्याचे दिसत असतानाही निलंग्याचे पोलिस मात्र हतबल झाल्याचे दिसत आहेत. तीन चोरीच्या घटना घडल्या असून सीसीटीव्ही कॅमे-यात चोरी करणारे कैद होऊनही सुगावा लागत नाहीये यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.

(edited by- pramod sarawale)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT