police
police 
मराठवाडा

तृतीय पंथीयांमुळे पोलिसांनाच काढावा लागला ठाण्यातून पळ

योगेश पायघन

औरंगाबाद : उस्मानपूरा पोलिस ठाण्यात पकडलेल्या रिक्षाचालकाला भेटण्यासाठी आलेल्या तृतीय पंथीयाची छेड ठाण्यात साफसफाई करणाऱ्या खबऱ्याने काढली. त्याच्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी करणाऱ्या तृतीय पंथीयाला पोलिस दाद देत नसल्याने त्याने तृतीय पंथीयांना जमवले. जमलेल्या घोळक्‍याने ठाण्यात चांगलाच हंगामा केला. 

तृतीय पंथीयांना आवरणे कठिण झाल्याने काहीकाळ पोलिसांनाच पोलिस ठाण्यातुन पळ काढवा लागला. दरम्यान, तृतीय पंथीयांची छेड काढणारा खबऱ्या पोलिस ठाण्याच्या मागच्या भिंतीवरुन उडी मारून पळून गेला. उडी मारल्यामुळे एका कारची काचही फुटली. खबऱ्या अद्याप फरार आहे. याप्रकरणी बुधवारी (ता. सात) लक्ष्मीपूजनाच्या मध्यरात्रीपासून उस्मानपूरा पोलिस स्टेशनध्ये गोंधळ घालणाऱ्या सहा तृतीय पंथियांविरोधात शहादेव पालवे यांच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवुन धिंगाणा घातल्याचा गुन्हा गुरुवारी (ता. आठ) नोंदविण्यात आला. 

असे घडले प्रकरण 
उस्मानपूरा पोलिस स्टेशनमध्ये एका रिक्षा चालकाला पकडून आणण्यात आले होते. त्याच्या भेटीसाठी आलेल्या तृतियपंथीयांची पोलिस स्टेशनमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या पूर्वाश्रमीच्या खबऱ्याने छेड काढली. खबऱ्याने तृतीयपंथीयांची छेड काढत त्याला शिवीगाळ केली. चिडलेल्या तृतीय पंथीयाने त्या खबऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतू पोलिस दाद देत नसल्यामुळे तृतीय पंथीयाने आपल्या सहकाऱ्यांना पोलिस स्टेशनमध्ये बालावून घेतले. त्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात रात्रभर गोंधळ घातला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT