पोलिसांनी अटक केलेले संशयित.
पोलिसांनी अटक केलेले संशयित. 
मराठवाडा

सिनेस्टाईल पाठलाग करून 46 किलो गांजा पकडला, तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - शहरात गांजाची विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेशातून आलेल्या चौघा संशयितांचा पुंडलिकनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. झाल्टा परिसरात तिघांच्या मुसक्‍या आवळल्या. पळताना चौथा संशयित खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कारवाई मंगळवारी (ता.16) सकाळी करण्यात आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पोलुमल्ली आप्पाराव (वय 30, रा. तुर्क गोदावरी), कोसुरी पट्टराव (35, रा. राजकुलमंडी, जि. तुर्क गोदावरी) व केडमी आप्पाराव (19, रा.
नोसलीपट्टम, जि. विशाखापट्टणम) अशी संशयितांची नावे आहेत. दुर्गम रॉमेन लक्ष्मण (22, रा. राज कुलमंडी) असे जखमीचे नाव आहे. पोलिस नाईक बाळाराम चौरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयितांवर गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर अटकही करण्यात आली. अशी माहिती पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी सापळा लावला होता. 

सिनेस्टाईल पाठलाग 
बीडकडून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये गांजा असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्याआधारे दोन पथके तयार करीत पोलिसांनी झाल्टा फाटा परिसरात सापळा लावला. संशयित ज्या कारमध्ये होते त्यांनी त्या कारची मूळ नंबरप्लेट काढून त्या ठिकाणी बनावट नंबरप्लेट लावली होती. हा बनावट क्रमांकही पोलिसांना कळाला होता; मात्र झाल्टा फाटा येथे ट्रॅफिक जाम झाल्याने आणि समोरून गस्त घालणारे पोलिसांचे वाहन दिसल्याने संशयितांनी कार सोडून शेताकडे धूम ठोकली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान, संशयित दुर्गम
लक्ष्मण हा पळताना एका खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय पाठलाग करून त्याच्या इतर दोघा साथीदारांनाही पकडले. त्यांनी डिक्कीत गांजा असून, तो विक्री करण्यासाठी शहरात आल्याची कबुली दिली. 
 

हुसेन कॉलनीत विक्री 
आपला एक साथीदार पोलुमल्ली आप्पाराव हा गांजा विक्री करण्यासाठी काही सॅम्पल घेऊन हुसेन कॉलनीत गेल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वाहनातील गांजा असलेल्या दहा पिशव्या व कार जप्त केली; तसेच पोलुमल्ली यालाही हुसेन कॉलनीतून अटक केली. 
  
सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 
तिघा संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (ता.22) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दिले. गांजा तस्करी करणारे हे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता असल्याने आंध्र प्रदेशात जाऊन तपास करणे असल्याने संशयितांना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील कदम यांनी न्यायालयाकडे केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; "त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल.." पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT