crime 
मराठवाडा

‘त्या’ प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा

बिलोली ः तालुक्यातील शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेले प्राचार्य धनंजय शेळके व मुख्याधापक प्रदीप पाटील या दोघांना मंगळवारी (ता. चार) बिलोली येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.

साईबाबा विद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी सय्यद रसूल, राजुरे या दोन मुख्य आरोपींसह शाळेचे मुख्याध्यापक व स्वयंपाकी महिला या पाच जणांविरुद्ध रामतीर्थ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी फरार झाल्यामुळे या घटनेचे तीव्र पडसाद सबंध जिल्ह्यावर उमटले. तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घटनेविरोधात आवाज उठविला. 

पोलिस कोठडीची मागणी फेटाळळी
यातील मुख्य आरोपी सय्यद रसूल यास अटक करण्यात पोलिसांना यश आले. तद्‍नंतर प्रजासत्ताकदिनी या घटनेतील सहआरोपी असलेले प्राचार्य धनंजय शेळके व मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील आठवड्यात मुख्य आरोपी रसूल यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर सहआरोपी असलेल्या दोन्ही मुख्याध्यापकांच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. मंगळवारी (ता. चार) या घटनेतील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. घटनेचे तपासणी अधिकारी व अहमदपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी पाटील यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, दोन्ही आरोपींना अधिक चौकशीसाठी दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी पोलिसांना मिळाल्यामुळे त्यांना पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी दोन्ही सहआरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुख्य आरोपी अद्यापही फरार
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सहशिक्षक राजुरे अद्यापही फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. आरोपी असलेल्या एका महिलेला ही पोलिसांनी न्यायालयात घेतलेले नाही. दरम्यान, या घटनेतील पीडित मुलीस रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

मुलीस पोलिस संरक्षण देण्यात यावे
या मुलीस पोलिस संरक्षण देण्यात यावे, तिचे पुनर्वसन करण्यात यावे, भविष्यात तिच्या कुटुंबीयांचेही संरक्षण करण्यात यावे. या प्रकरणाचा निकाल लागून दोषींना सजा होईपर्यंत मुलीच्या कुटुंबीयांना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी लोकस्वराज्य जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रा. रामचंद्र भरांडे, बिलोलीचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे यांच्यासह अनेकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT