Two married womens suicidal case because of tortour of in law house
Two married womens suicidal case because of tortour of in law house  
मराठवाडा

छळाला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या; एकीने जाळून तर दुसरीने गळफास घेतला

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सासरच्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून वेगवेगळ्या घटनांत दोन विवाहितांनी आत्महत्या केली. यातील एकीने गळफास तर दुसरीने जाळून घेऊन आपले जीवन संपविले. या दोन्ही घटना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नांदेड व पाटोदा (नायगाव) येथे घडल्या. 

शहराच्या राजेशनगर भागात राहणारी विवाहिता वर्षा कचरु पावडे (वय ३६) हिला लग्नांनंतर सासरच्या मंडळींनी काही दिवस चांगले नांदवले. या दरम्यानच्या काळात या दाम्पत्याला दोन अपत्य झाली. कापडाची दुकान चालविणारा पती कचरु पावडे हा कर्जबाजारी झाला. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तो आपली पत्नी वर्षा हिला माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करीत होता. परंतु एवढी रक्कम पालकांकडून कशी आणावी व ते कुठून देतील म्हणून वर्षाही पतीचा त्रास सहन करीत होती. मात्र हा त्रास वाढत गेल्याने अखेर तिने आपल्या राहत्या घरी मंगळवारी (ता. १४) रात्री आठच्या सुमारास पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती कर्तव्य अधिकारी फौजदार अनिता चव्हाण यांना मिळाली. यावेळी घटनास्थळाला पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनीही भेट दिली. गोपीनाथ मुंजाजी खैरे यांच्या फिर्यादीवरुन भाग्यनगर ठाण्यात पती कचरु देविदास पावडे रा. पुयणी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. गुरूवारी (ता. १६) सकाळी तिच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून  पार्थीव नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याचे तपासीक अमलदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. के. डमाळे ह्यांनी सांगितले. पती कचरु पावडे याला अटक केली आहे. 

तर दुसऱ्या घटनेत शिवकांता संभाजी हंबर्डे (वय २०) रा. पाटोदा ता. नायगाव या महिलेनी सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून नऊ आॅगस्ट रोजी आपल्या राहत्या घरी दुपारी साडेतीनच्या सुमारास अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यात ती गंभीररित्या भाजली. नातेवाईकांनी तिला नांदेडच्या आधार हॉस्पीटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारादरम्यान मंगळवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झाला. तिच्या मृत्यूपूर्व जबानीवरून पती संभाजी हंबर्डे, सासु भारतबाई हंबर्डे, करूणा शिंदे आणि भागरनबाई शिंदे यांच्याविरूध्द मरणास कारणीभूत झाल्याप्रकरणी कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. मरे हे करीत आहेत.        

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT