मराठवाडा

बलात्कार प्रकरणी दोघांना जन्मठेप व दंडाची शिक्षा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड - घरात झोपलेल्या महिलेला ठार मारण्याची धमकी देऊन उचलून नेऊन तिच्यावर सामुहीक बलात्कार करणाऱ्या दोघांना येथील जिल्हा न्यायाधिश ए. जी. मोबे यांनी जन्मठेप व प्रत्येकी 50 हजाराच्या दंडाची शिक्षा गुरूवारी (ता. 5) ठाेठावली. याच प्रकरणातील दोघांची मात्र पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली.

अर्धापूर तालुक्यातील कामठा (गणपूर) येथील 32 वर्षीय एक महिला नांदेडच्या लक्ष्मीनगर भागात राहत असे. ती आपल्या घरात 25 जानेवारी 2013 मध्ये झोपली होती. यावेळी बळजबरीने तिच्या घरात घुसून ठार मारण्याची धमकी देऊन तिला घरातून उचलून नेऊन तिच्यावर आळीपाळीने चार जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी विमानतळ ठाण्यात बलात्काराचा आरोपी पंकज दाभाडे रा. शिवनगर, शेख रसुल शेख अमीर रा. महेबुबनगर, संजय घोरपडे आणि नितीन पाईकराव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस अधिक्षक निर्मलादेवी यांनी तपास करून आरोपींना अटक केली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात 11 साक्षिदारापैकी सहा साक्षिदार फितुर झाल्याने पाच साक्षीदार तपासले. पिडीत महिलेचा जवाब आणि वैद्यकीय अहवाल लक्षात घेता यातील पंकज दाभाडे आणि शेख रसुल शेख अमीर यांना जन्मठेप व प्रत्येकी 50 हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. तर संजय घोरपडे व नितीन पाईकराव यांची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षाची बाजू ॲड. संजय लाटकर यांनी मांडली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT