मराठवाडा

महापालिकेच्या रडारवर दोन हजार इमारती

सकाळ वृत्तसेवा

लातूर : महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी सध्या प्रशासन कामाला लागले आहे. यातून दिलेल्या परवान्यापेक्षा जास्तीचे बांधकाम किंवा परवाना न घेता केलेले बांधकामावर प्रशासनाचे लक्ष आहे. शहरात गेल्या काही महिन्यांत सुमारे सत्तर इमारतींच्या बांधकाम नियमितीकरणातून महापालिकेला साडेचार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. अशा दोन हजार इमारती आता महापालिकेच्या रडारवर आहेत.

महापालिका सुरवातीपासून आर्थिक अडचणीत आहे. सुमारे तीनशे कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे आयुक्त अमन मित्तल यांनी उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी अनधिकृत किंवा परवान्यापेक्षा अधिक बांधकाम असलेल्या इमारतींवर लक्ष केंद्रित केले आहे. यातून त्यांनी शहरातील ७९५ इमारतींना नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर टप्प्या टप्प्याने संबंधितांची सुनावणी घेतली जात आहे. संबंधितांचे बांधकाम परवान्याशी संबंधित तसेच महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. बांधकाम परवाना नसेल किंवा परवन्यापेक्षा अधिकचे बांधकाम केले असेल तर शुल्क व दंड आकारून नियमितीकरण (रेग्युलाईज) केले जात आहे.

शहरात अनधिकृत बांधकाम किंवा परवान्यापेक्षा जास्त बांधकाम केलेल्या इमारती आहेत. कायद्यानुसार अशा इमारती शुल्क व दंड नियमित करता येतात. या पुढील काळातही ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

- अमन मित्तल, आयुक्त, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT