Uddhav Thackeray at Lasur Station
Uddhav Thackeray at Lasur Station 
मराठवाडा

शेतकऱ्यांना नडाल तर... उद्धव ठाकरेंचा पीक विमा कंपन्यांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

लासूर स्टेशन : ''जर शेतकऱ्यांना नडाल, तर विमा कंपन्यांची कार्यालये शिवसेना बंद करेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्याना दिला. लासूर स्टेशन (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे आज (शनिवार) शिवसेनेच्या पीक विमा मदत केंद्राची पाहणी करण्यासाठी ठाकरे आले होते. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी लासूर स्टेशन येथे शिवसेनेचे राज्यातील पहिले पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना पुढाकार घेत आहे. आज उद्धव यांनी या केंद्रास भेट दिली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विनोद घोसाळकर, संजय सिरसाट, प्रशांत बंब, मनीषा कायंदे, अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, अण्णासाहेब माने, नंदकुमार घोडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले की, जगात जनावरे ,बैलांना पुरणपोळी खाऊ घालणारी आपली संस्कृती आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना छावणी, धान्यपुरवठा, विविध प्रकारे मदत करण्याचे काम शिवसेनेने केले. शासनाच्या अनेक चांगल्या योजना तळागाळापर्यंत पोहचत नाही, म्हणून अनेकदा सरकारविरोधात ओरड केली जाते, याकडे शिवसेना लक्ष देणार आहे.

पीक विमा कंपन्यांना इशारा देताना ठाकरे म्हणाले की, ''पीक विमा योजनेत अनेक विमा कंपन्यानी शेतकऱ्यांचे पैसे घेतले, परंतु अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत विमा मिळाला नाही. याद राखा, जर राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळाल, तर गाठ शिवसेनेशी आहे. प्रसंगी मुंबईतील या कंपन्यांची सर्व कार्यालये बंद करू.''

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी प्रास्तविक करताना जिल्ह्यातील तसेच गंगापूर तालुक्यातील पाणीप्रश्न, उपाययोजना याविषयी माहिती दिली. शासनाने जायकवाडी धरणातून या भागातील छोटीमोठी धरणे, तलावात वॉटर ग्रीड करून पाणी आणावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT