beed
beed 
मराठवाडा

पंकजा ताईला साथ देण्याचा दोन्ही छत्रपतींचा शब्द

प्रवीण फुटके/दिगंबर देशमुख

परळी : विचार, आचार आणि वागण्यात दोन वेगवेगळे टोक असलेले सातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनाला एकत्र आले. शिवाय बहीण म्हणून पंकजा मुंडे यांना साथ देण्याचा शब्दही दोन्ही छत्रपतींनी दिला. उदयनराजे मुंडेंच्या आठवणीने भावूक झाले. 

छत्रपत्री संभाजी भोसले म्हणाले, आम्हाला निमंत्रणाची गरज नाही. तो आमचा हक्क असून एक बहीण एका भावाला हक्काने बोलावते.  पण ज्यांनी आमचा सन्मान केला त्या दिवंगत मुंडे यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंडे भगिनींच्या मागे दोन्ही छत्रपतींची ताकत आहे. 

उदयनराजे भोसले म्हणाले,गोपीनाथराव मुंडे लोकराजा होते. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. दिवंगत मुंडे मार्गदर्शक, मित्र होते. वडीलानंतर वडीलकीच्या नात्याने मला जवळ केले. मी छत्रपती म्हणून नाहीतर त्यांचा मुलगा म्हणून आलो आहे. कधीही हाक मारा साथ द्यायला तयार आज असा शब्द देत मी कालही तुमचा होतो, आजही तुमचा, भविष्यात काहीही बदल होणार नाही.

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवारी (ता. तीन) परिसरातील गोपीनाथ गडावर झालेल्या अभिवादन सामाजिक उत्थान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले, मंत्री राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री विजयराव देशमुख, मंत्री सदाभाऊ खोत, संघटन मंत्री भाऊराव देशमुख, विजयराव पुराणिक, आमदार संगीता ठोंबरे, आमदार वसुरजितसिह ठाकूर, आमदार आर. टी. देशमुख,  आमदार शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे, विजय गव्हाणे यांच्यासह मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, थोरल्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे यांच्यासह लोकांची मोठी उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT