Ambulance Fire
Ambulance Fire sakal
मराठवाडा

Ambulance Fire : उमरग्यात रुग्णवाहिका पेटली! सुदैवाने जीवितहानी झाली नाही

अविनाश काळे

उमरगा - धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहराच्या मध्यवर्ती भागातील आरोग्यनगरीत बुधवारी (ता. सात) रात्री साठेआठच्या सुमारास रूग्णवाहिका अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. या बाबतची माहिती अशी की, उमरगा शहरात विविध आजारावरील उपचाराचे अत्याधुनिक सोयीची आरोग्यनगरी आहे. अनेक गंभीर रूग्ण, अपघातातील जखमींना उपचारासाठी हलवण्यासाठी रूग्णवाहिकेची संख्याही वाढली आहे.

बुधवारी रात्री साठे आठच्या सुमारास रूग्णवाहिका आरोग्यनगरीत जात असताना विपुल व्हरटेक्स इमारतीच्या कॉर्नरजवळ रुग्णवाहिकेत स्प्रॉक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालक प्रसंगावधन राखुन बाहेर पडला. आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरात भितीचे वातावरण होते. रुग्णवाहिका गॅस किटवर असल्याच्या चर्चेने भितीत आणखी भर पडली. एक वेळ मोठा आवाजही झाला.

नागरिकांनी महावितरणला दुरध्वनी करून वीज खंडीत करण्याचे सांगितल्याने वीस मिनीट वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. यावेळी एकाने आग विझवण्यासाठी छोट्या सिलेंडरची फवारणी केली. परंतू आग मोठी होती. शेवटच्या टप्प्यात पालिकेचा अग्निशमक वहानाने आग आटोक्यात आणली. आगीत रूग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT