Umarga Crime News
Umarga Crime News  esakal
मराठवाडा

Umarga Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष सक्त मजूरीची शिक्षा

अविनाश काळे

Umarga Crime News: तालुक्यातील मुळज येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी उमरगा जि. धाराशिव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस मंगळवारी (ता. ३०) दहा वर्ष सक्तमजुरी व चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या बाबतची माहिती अशी की, १० सप्टेंबर २०२२ रोजी मुळज येथील पिडीत मुलगी घरी एकटीच होती. आई, वडिल  शेतात जाण्यासाठी निघाले असताना काही अंतरावर  गेल्यानंतर अचानक पाऊस आल्याने ते दोघेही शेताकडे न जाता ते पुन्हा त्यांच्या घराकडे  परतले.

परंतू त्या दोघांनाही त्यांच्या घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसला. पिडीत मुलीला आईने विचारले असताना तिने आरोपी संजय शिवाजी गंगथडे अचानक घरी येऊन  आतून दार बंद करुन  जबरदस्तीने अत्याचार केल्याचे  सांगितले.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार संजय गंगथडे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपत्र निश्चित केले. या प्रकरणी शासना तर्फे एकुण अकरा साक्षीदार तपासण्यात आले.

आरोपीतर्फे पिडीतीच्या वडीलांना तपासण्यात आले. साक्षीदार पिडित मुलगी, वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रवीण जगताप, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने, पोलिस हवालदार संतोष बोयणे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली.

न्यायालयापुढे आलेला पुरावा व सहाय्यक शासकिय अभियोक्ता अँड. संदीप देशपांडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरुन  विशेष जिल्हा न्यायाधिश डी. के. अनुभूले यांनी मुळज येथील आरोपी संजय  गंगथडे यास विविध कलमाद्वारे दहा वर्ष सक्तमजुरी व ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 LIVE : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll 2024 : अजित पवारांच्या पक्षाला एक्झिट पोलमधून धक्का; किती जागा मिळणार?

Latest Marathi News Live Update: लोकसभेचा शेवटचा टप्पाही उरकला; 59 टक्के मतदानाची नोंद

Baramati Exit Poll : बारामतीचा कल हाती! सुनेत्रा पवारांना धक्का, पुन्हा सुप्रिया सुळेच होणार खासदार?

Ahamadnagar Exit Poll: अहमदनगर लोकसभेत सुजय विखेंना धक्का? EXIT Pollचा अंदाज निलेश लंकेंच्या बाजूने

SCROLL FOR NEXT