Vela Amavashya Celebration
Vela Amavashya Celebration sakal
मराठवाडा

Umarga News : शेत शिवारात वेळा अमावस्या उत्साहात साजरी

अविनाश काळे

उमरगा, (जि. धाराशिव) - धाराशिव, लातूर जिल्ह्यासह सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांच्या अनेक गावात वेळा अमावस्यांची प्रथा कित्येक वर्षापासुन सुरु आहे. निसर्गाचा दगाफटका कितीही बसो, पण काळ्याआईची मनोभावे पुजन करत शेतकऱ्यांनी शेतातील उत्पन्ना समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करून गुरुवारी (ता. ११) वेळा अमावस्या (येळवस) उत्साहात साजरी केली.

दरम्यान यंदा रब्बीच्या पेरण्याचे गणीतच कोलमडल्याने पीक, पाण्याची अवस्था बिकट आहे; तरीही पाण्याच्या उपलब्धेतेमुळे बहर असलेल्या पिक शिवारात शेतकरी कुटुंबांनी वनभोजनाचा आनंद घेतला.

वेळा अमावस्याचा सण हा शेतकरी कुटुंबासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. यंदा कमी पर्जन्यमानामुळे खरीप हंगामातील पिकाचे उत्पन्न जेमतेम निघाले. कमी ओलाव्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी उशीरा सुरू झाली. पेरणीची टक्केवारी निम्म्यावर आली परिणामी ज्वारीचे क्षेत्र घटले. बहुतांश कोरडवाहु क्षेत्रात पेरणीच नाही.

पाण्याची उपलब्धता असलेल्या शिवारातील पिके बहरात आले असले तरी पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा शेतकऱ्यांना खटापोट करावा लागतोय. दरम्यान अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात बुधवारपासुनच (ता.१०) तयारी सुरू होती. गुरुवारी पहाटे अंबिलाचं बिंदग डोक्यावर घेऊन जाण्याची लगभग शेतकऱ्यांमध्ये दिसून आली.

आता दळणवळणाची साधने वाढल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी बिंदग्याचा प्रवास वहानातुन करीत असल्याचेही चित्र दिसून आले. बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. पण क्वचित ठिकाणीच बैलगाडी दिसत आहे. अजुनही बरेच शेतकरी कुटुंबियांनी बैलगाडीतुन वेळ अमावस्येला जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे.

शिवाय दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवाची विधीवत पुजा केली, त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा, करडई पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला.

सहकुटुंब, मित्र मंडळीच्या सहवासात वन भोजनाचा आनंद

बाजरीपासुन बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच विविध पालेभाज्यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांग्याचं कांद्याची भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) आणि वरून चवदार अंबिलाचा घोट घेत दुपारी साडेबारानंतर शेत शिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंब व मित्रपरिवारांनी मनसोक्त स्वाद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मोहळ मारून त्याचा आस्वाद घेण्यासाठी तरूण, चिमूकले बांधा, बांधावरून फिरत होते.

सिमावर्तीय कर्नाटकातही वेळा - अमावस्या साजरी

उमरगा तालुका कर्नाटक राज्याच्या सिमेलगत असल्याने बहुतांश सण- उत्सव जवळपास एकसारखे असतात.  कर्नाटकातील  सिमावर्ती भागातील खजुरी, आणूर, होदलूर, आळंगा, लाडवंती, नंदगुर, रूद्रवाडी, जामगा, हत्तरगा, हिप्परगा आदी भागात वेळा अमावस्या साजरी करण्यात आली.

शहरात अघोषित संचारबंदी !

वेळा अमावस्या असल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद होती. घरातील मंडळी शिवारात गेल्याने शहरात एक प्रकारची अघोषित संचारबंदी दिसून आली. शासकिय, निमशासकिय कार्यालयांना सुट्टी नव्हती ; तरीही वेळा अमावस्या असल्याने बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खुर्चा रिकाम्या दिसत होत्या.

वेळा अमावास्येचा सण मोठा

माणसांनी रान फुलले

मायमातीचे ऋण फेडण्या

शेतकऱ्यांची लगबग चाले...

- कवी डॉ. बालाजी इंगळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT