The unauthorized construction of mayor is now going to be inspected by the InCamera
The unauthorized construction of mayor is now going to be inspected by the InCamera 
मराठवाडा

लातूर : महापौरांच्या अनाधिकृत बांधकामाची आता इनकॅमेरा पाहणी

हरी तुगावकर

लातूर : लातूरचे भारतीय जनता पक्षाचे महापौर सुरेश पवार यांनी आपल्या
घराचे अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकचे आयुक्त कौस्तुभ
दिवेगावकर यांच्यासमोर सोमवारी (ता. 4) सुनावणी झाली. यात नैसर्गिक
न्यायाच्या दृष्टीने आता श्री. पवार यांच्या अनाधिकृत बांधकामाचे मंगळवारी
(ता. 5) सकाळी 11 वाजता इनकॅमेरा स्थळपाहणी करून मोजमाप करण्याचे
आदेश दिले आहेत. 

या प्रकरणात काँग्रेसचे नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांची तक्रार आहे.
महापौर पवार व तक्रारदार गोविंदपूरकर या दोघांनाही यावेळी उपस्थित
राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता ता.
18 फेब्रुवारीला होणार आहे.

येथील मोतीनगर भागातील वीर हनमंतवाडी येथील सर्वे नंबर 181 प्लॉट नंबर 54, सिटी सर्वे नंबर 10129 व महानगरपालिका मालमत्ता क्रमांक आर 7 /946/6 मधील 213.65 चौरस मीटर क्षेत्रावर महापौर सुरेश पवार यांनी घराचे अनाधिकृतपणे बांधकाम केलेले आहे. पदावर असताना त्यांनी हे बांधकाम केले आहे. त्यामुळे श्री. पवार यांना महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 10 (1 ड)च्या तरतुदीनुसार कार्यवाही करून पालिका सदस्य म्हणून अपात्र करावे, अशी तक्रार काँग्रेसचे नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांनी आयुक्तांकडे केली होती. 

त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी श्री. पवार यांच्या अनाधिकृत
बांधकामाचा पंचनामाही केला होता. त्यानंतर हे प्रकरण आयुक्त कौस्तुभ
दिवेगावकर यांच्यासमोर सुनावणीसाठी सुरु झाले आहे. यात सोमवारी (ता. 4) पहिली सुनावणी झाली. यात श्री. पवार यांच्या वतीने अॅड. महेश मुळे यांनी काम पाहिले तर श्री. गोविंदपूरकर यांच्या वतीने अॅड. किरण जाधव यांनी बाजू मांडली. या सुनावणीच्या वेळी श्री. पवार मात्र अनुपस्थित होते. श्री. गोविंदपूरकर हे मात्र उपस्थित राहिले.

यावेळी आयुक्त दिवेगावकर यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर मंगळवारी (ता. 5) सकाळी 11 वाजता श्री. पवार यांच्या अनाधिकृत बांधकामाची इनकॅमेरा स्थळपाहणी करून मोजमाप करण्याचे आदेश दिले आहेत. याकरीता उपायुक्त हर्षल गायकवाड यांच्या नेतृत्वात एक पथक ही पाहणी करणार आहे. यावेळी श्री. पवार व श्री. गोविंदपूरकर यांना उपस्थित राहण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. पुढील सुनावणी ता. 18 फेब्रुवारीला होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT