budget
budget 
मराठवाडा

Budget 2021: नवी उभारी देणारी घोषणांची बजेटमधून अपेक्षा

प्रकाश बनकर

औरंगाबाद: 2020 वर्ष हे कोरोनामुळे वाया गेले. सहा ते सात महिने व्यापार, उद्योगासह जनजीवन ठप्प होते. यात केंद्र आणि राज्य सरकारने काही प्रमाणात उद्योग उभारीसाठी काही घोषणा आणि सवलती जाहिर केल्या. या लॉकडाऊनच्या काळात सर्वांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहेत.

आता काही प्रमाणावर उद्योग, व्यावसाय पुर्वपदावर येत आहेत. असे असले तरी, आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात व्यापाऱ्यांनी जीएसटीतील दंडाची सुट, उद्योजका प्रमाणेस व्यापाऱ्यांनाही सवलती द्यावीत. देशातील मोठे कामे सुरु करावीत यातून आता सर्व अर्थचक्र सुरु होणे गरजेचे आहेत. असे अनेक नवीन निर्णय व्यापारी, उद्योजकांच्या हिताचे निर्णय एक फेब्रुवारीला होणाऱ्या अर्थसंकल्पातून होणे गरजेचे असल्याची अपेक्षा या दोन्ही घटकांनी व्यक्त केली आहे.

व्यापारी ट्रेडसाठी कायदा करावा 
प्रफुल्ल मालाणी,( अध्यक्ष.मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स): ज्या प्रमाणे उद्योगासाठी, कामगारासाठी कायदा आहे. त्याच प्रमाणे ट्रेडसाठी कायदा असावा. कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या काळात सरकारकडून व्यापारी वर्गाल कुठलीच मदत मिळाली नाही. यामुळे जीएसटी दंड आणि व्याजासह माफ करावेत.यासह जीएसटीच्या जाचक अटी सीए यांच्याशी रद्द करावेत. 

व्यापाऱ्यांचे प्रश्‍न संसद व विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडवे 
अजय शहा(वरिष्ठ उपाध्यक्ष,कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) 
कोरोनामुळे सामन्य,नागरिक व लहान व्यापारी त्रस्त आहेत. त्यांच्या व्यापाऱअयावर ५० ते ६० टक्के परिणाम झाला आहे. त्या व्यापाऱ्यांना आता सवलती देत प्रोत्साहन देण्याची गरज आहे. दरवेळी उद्योजकांना सबसीडीची इतर सुविधा देण्याच्या दुष्टीने विचार होतो. असा व्यापाऱ्यांविषयी विचार होत नाही.

व्यापारी हा काम करीत नाही का? विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभेत कधीही व्यापाऱ्यांच्या विषयावर चर्चा करताना कोणताही नेता दिसत नाही. या सभागृहात आमचा विचार करावा, आमचे विषय तिथे घ्यावेत. कोणालाही व्यापाऱ्याबद्दल आस्था नाही. अस्था दाखवावी व्यापाऱ्यावर कुरघोडी असते. याच व्यापाऱ्यांनी चोर म्हणण्यात येते. देशातील चार कोटी व्यापाऱ्यांचे विषय केंद्र आणि राज्यातील दोन्ही सभागृहात मांडावेत. 

कुषी साहित्यावरील जीएसटी हटवावी 
जगन्नाथ काळे (अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ) 
कोरोनाच्या व्यापारी त्रस्त होतो. त्याला कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांना करात सवलत दिली गेली पाहिजेत. व्यापारी नियमीत प्राप्तीकर भरतात. त्यात सवलत देण्यात आली पाहिजेत.यासह व्यापाऱ्यांनी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले पाहीजेत. यासह शेतीसाठी लागणारे साहित्य खते-औषधीवरील वरील जीएसटी हटविण्यात यावीत. 
जीएसटीचे स्लॅब १८,१२ टक्केचा स्लॅब कमी करण्यात यावा. जीएसटीसाठीचे पोर्टल मध्ये नेहमीच अडचण असतात. त्यावर कायम स्‍वरूपी तोडगा काढावा. 

उद्योजक एमएसएमईला वेळेवर पैसे मिळावेत -
देशाचे अर्थचक्र पुर्वरत करण्यासाठी पायाभुत सुविधेतील मोठे प्रकल्प सुरु करणे गरजेचे आहे. यातून सर्वच क्षेत्राला सुरु होईल. यामुळे सर्व केंद्र आणि राज्याचे मोठे प्रोजेक्ट सुरु करावेत.यासाह एमएसएमईला वेळेवर कर्ज, मिळतील यासाठी सिस्टिम तयार करायला पाहिजेत. छोटे उद्योगाना वेळेवर कर्ज व सवलती न मिळाल्यामुळे त्या बंद पडल्या. कोरोना काळात छोटे-मोठे पाच ते दहा टक्के उद्योग बंद पडले. एमएमएमई अंतर्गत येणाऱ्या उद्योगाचा चालना देणाऱ्यासाठी निर्णय व त्याची प्रत्यक्ष अंमलबाजावणी होणे गरजेचे आहे- अभय हंचनाळ (अध्यक्ष, मसिआ) 

 (edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT